
चेंबूर : प्रतिनिधी (प्रणील पडवळ) सावित्री प्रतिष्ठान व कॅन्सर एड पेशेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना चेंबूर विधानसभा मतदार संघात खास महिलांसाठी सत्यभामा हॉल, अमर टॉकीज चेंबूर येथे कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात महिलांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता.

सदर उपक्रमाला मनसे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या पत्नी सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे (वाहिनीसाहेब) व मनसे सरचिटणीस मा सौ रिटाताई गुप्ता यांनी सुद्धा भेट दिली. यावेळी सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे (वाहिनीसाहेब) यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले तसेच येणाऱ्या दिवसात असाच उपक्रम चेंबूरमध्ये आणखी राबवण्यात येतील अशी ग्वाही दिली.
यावेळी मनसे विभाग अध्यक्ष चेंबूर विधानसभा श्री. माऊली थोरवे यांनी चेंबूर विभागातील विविध प्रश्न उपस्थित केले. आज बेरोजगारीचा मुद्धा जटील होत असून चेंबूरमध्ये अनेक कंपन्या असून या कंपन्यांच्या प्रदूषणाचा त्रास सर्व चेंबूरकरांना भोगावा लागत आहे या कंपन्यांमध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात यासाठी लवकरच आंदोलन छेडणार आहोत अशी माहिती त्यांनी सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे (वाहिनीसाहेब) यांना दिली.
तसेच श्री. माऊली थोरवे यांनी SRA चा मुद्धा सुद्धा सौ शर्मिला राजसाहेब ठाकरे (वाहिनीसाहेब) यांना राजसाहेबांपर्यंत पोहचवण्याची विनंती केली यावर बोलताना हा मुद्धा राज साहेबांच्या कानावर घालून चेंबूर मधील SRA च्या मुद्द्यावर बैठक घेऊन प्रश्न सोडवू असं आश्वासन त्यांनी दिले !!
जाहिरात

जाहिरात

जाहिरात
