ठाणे : निलेश घाग ठाणे येथील किसन नगर परिसरा पाठोपाठ आता शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसन नगरमधील उर्वरित भागात समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविण्यास राज्याच्या मंत्रिमंडळाने गुरुवारी मान्यता दिली. यामुळे या भागातही क्लस्टर योजनेचा प्रकल्प राबविण्याचा मार्ग मोकळा झाला असून या ठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारती पावसाळय़ात कोसळून जीवितहानी होते. अशा घटना टाळण्यासाठी अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येत आहे
किसन नगर परिसरा पाठोपाठ आता शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसन नगरमधील उर्वरित भागात समुह पुनर्विकास (क्लस्टर) योजना राबविण्यात येणार आहे. महात्मा फुले नविनी करणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित (महाप्रित) या शासकीय कंपनीच्या माध्यमातून येथे हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी महाप्रित या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
पहिल्या टप्प्यात किसन नगर भागात सिडकोच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येत असून याठिकाणी प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना हक्काची आणि मालकी घरे मिळणार आहे.
किसन नगरमधील उर्वरित भागात समुह विकास प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे महापालिके बरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात