शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावात महावितरण कर्मचाऱ्यांना मारहाण

Spread the love

ठाणे: प्रतिनिधी (निलेश घाग) शिळफाटा रस्त्यावरील नीळजे गावात एका ग्रामस्थ ग्राहकाने वीजेचे देयक महावितरणकडे भरणा केले नव्हते. महावितरणच्या वीज देयक तपासणी पथकाने या ग्राहकाला वीज देयक भरण्यासाठी तगादा लावला होता. तरीही ग्रामस्थ ग्राहक थकीत वीज देयक भरणा करण्यासाठी तयार नव्हता. पथकाने त्याच्या घराचा वीज पुरवठा खंडीत करताच संबंधित ग्रामस्थ ग्राहकाने महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण करुन महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केली. वीज देयक भरणा न करणाऱ्या ग्राहकाचे नाव संतोष एकनाथ पाटील आहे. त्यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी संतोष विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते (३३), विद्युत साहाय्यक रोशनी पटले, दिगंबर खंडाळकर, केशव मराठे हे साहाय्यक अभियंता चौधरी यांच्या आदेशावरुन वीज देयक थकीत रक्कम वसुल करण्यासाठी निळजे गावात शुक्रवारी सकाळी आले होते. ग्राहकांना समज देऊन त्यांना थकीत रक्कम तातडीने भरण्याची सूचना पथकाकडून केल्या जात होत्या. एकनाथ लडकू पाटील यांच्याकडे मोठ्या रकमेची वीज देयक थकबाकी होती. त्यांना यापूर्वी पथकाने देयक भरणा करा, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page