
दिवा (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी दिवा शहर पुरस्कृत शहरात ठिकठिकाणी श्री रामनवमी साजरी केली जाणार असून या निमीत्ताने ओबीसी सेल अध्यक्ष श्री रोशन प्रभाकर भगत आणि श्री सचिन रमेश भोईर यांच्यावतीने 30 मार्च रोजी मुंब्रा देवी काँलनी येथील भाजपा कार्यालय येथे महाआरती व महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरात गंगुबाई हाँस्पीटलचा स्टाफ विविध आजारांवर निदान करणार असून व्याधीग्रस्त नागरिकांना त्याचा लाभ घेता येणार आहे.नागरिकांनी या आरोग्य शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेवक श्री रोशन भगत यांनी केले आहे.
या महाआरोग्य शिबीराची सुरवात होण्यापुर्वी सकाळी 10 वाजता प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे.सकाळी 10.30 ते 2 वाजेपर्यंत गंगुबाई हाँस्पीटलच्या सहकार्याने नागरिकांसाठी विविध मेडिकल चेकअप करण्यात येणार आहे.या शिबीरात व्याधीग्रस्त आढळून आल्यास त्यांना संपुर्ण मोफत उपचारांची सुविधा प्रदान करण्यात येणार आहे.दमा,वात,संधीवात,पोटाचे आजार,डोळे तपासणी,रक्त तपासणी,स्त्रीयांचे आजार,बायपास,कान तपासणी,दात तपासणी,गर्भधारणेच्या समस्या आदी विविध आरोग्यविषयक सुविधा आणि तपासण्या केल्या जाणार आहेत.
या व्यतिरिक्त नागरिकांना ई-श्रमकार्ड,हेल्थ कार्ड,आधार कार्ड,मतदार नोंदणीसाठी विशेष सहकार्य केले जाणार आहे.या आरोग्य शिबीरासाठी नागरिकांनी रहीवाशी पुराव्यासाठी पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड सोबत आणने गरजेचे आहे. सायं.5 वाजता संगितमय रामभजन संध्याच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तद्नंतर ठरल्याप्रमाणे प्रभु श्री रामचंद्रांची महाआरती होणार आहे.त्यामुळे प्रभु श्री रामचंद्रांच्या कृपाशिर्वादामुळे आयोजित केलेल्या विविध आरोग्य सुविधा आणि महाआरतीचा नागरिकांनी अवस्श लाभ घ्यावा असे आवाहन समाजसेवक श्री रोशन प्रभाकर भगत आणि श्री सचिन रमेश भोईर यांनी केले आहे.