दिवा : श्री क्षेत्र, मोरेश्वर विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ आयोजक श्री.शैलेश सुदामा पाटील दिवा, मोरेश्वर कॉम्प्लेक्स येथे माघ/फाल्गुन शु. ८ शके १९४४ सोमवार दि. २७ फेब्रुवारी २०२३ रोजी मंडळाचा १५ वर्धापना निमित्त माघी श्री.गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी माघी गणेश जयंती उत्सवाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात येते. यामध्ये सर्वप्रथम सोमवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते २ या वेळेत श्री सत्यनारायण महापूजा श्रींची महाआरती त्यानंतर ७ ते ११ महाप्रसाद होणार आहे.व त्यानंतर रात्री ७ ते ८ श्रींची आरती ७:३० ते १० कीर्तन व यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व मान्यवरांच्या हस्ते स्वागत समारंभ होणार आहे, तरी समस्त दिवा व खर्डी येथील गणेश भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक श्री.शैलेश सुदामा पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे
सर्व गणेश भक्तांचे हार्दिक स्वागत :- आयोजक.शैलेश सुदामा पाटील
जाहिरात :