
मुंबई- दक्षिण मुंबईतून माधुरी निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात आहे. बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून अभिनेत्री माधुरी दीक्षित ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने अनेकांच्या मनावर राज्य केले. तिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आज माधुरी सर्वांची आवडती अभिनेत्री आहे. आता माधुरी दीक्षित राजकारणात प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांचा नुकताच मुंबई दौरा झाला. या दौऱ्यानंतर लोकसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून काही नावे चर्चेत आली आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. दक्षिण मुंबईतून माधुरी निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच पुण्यातील जागेसंदर्भातही माधुरीची चर्चा सुरु आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अमित शाह यांनी गेल्या वेळी मुंबई दौऱ्यादरम्यान माधुरीची भेट घेतली होती. त्यांच्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता नुकत्याच झालेल्या भाजपाच्या बैठकीमध्ये माधुरी दीक्षितचे नाव लोकसभा निवडणूकीसाठी दक्षिण मुंबईतून घेतले जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.