ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)ठाण्यात मागील दोन दिवसांपासून जोरदार अतिवृष्टीमुळे दिवा शहरातील रेल्वे स्टेशन लगत संयोजीवन भुवन सोसायटी व शेजारील काही बिल्डींगच्या आवारात नाल्यातील सांडपाणी व पावसाच्या साठलेले पाणी त्या बिल्डिंगच्या पिण्याच्या पाण्याचा टाकी मध्ये ते गेल्यामुळे तेथील रहिवाशांनी सौ.योगिता नाईक यांच्याशी संपर्क साधून तेथील रहिवाशांचे आरोग्य खराब झाल्यामुले तेथील रहिवाशांना आरोग्य सेवा लवकरात पुरवावी असे सांगण्यात आल्याने,
मा.आमदार श्री.सुभाषजी भोईर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व रहिवाशांच्या आरोग्य सेवेच्या मागणीनुसार, ठाणे.म.पालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधुन आज संयोजीवन भुवन सोसायटीच्या व आजूबाजूच्या १० सोसायट्यामधील नागरिकांचे पालिका प्रशासनाच्या सौजन्याने रक्त तपासणी, उलट्या-जुलाब व इत्यादी.आजारावर आरोग्य तपासणी करून ११ सोसायटीच्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचे नमुने (सॅम्पल) घेण्यात आले व पुढील तपासणीसाठी आरोग्य केंद्रात बोलवण्यात आले. त्यावेळी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहर महिला आघाडीच्या उपविभाग संघटक विनया कदम,शाखा संघटक सुवर्णा जाधव,शाखा संघटक संगीता उतेकर व महिला आघाडीच्या रणरागिणी उपस्थित होत्या.