पुरुषांसाठी लायकोपीन आवश्यक, कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी !!

Spread the love

⏩लायकोपीन (Lycopene) फायटोन्यूट्रिएंट्स (PhytoNutrients) म्हणजे वनस्पतींद्वारे (Plant) तयार करण्यात येणारे अँटीऑक्सिडेंट आहे.

⏩हे मानवी शरीरात नाही तर वनस्पतींमध्येच आढळते अँटिऑक्सिडंट (Antioxidant) आहे. हे पोषक तत्व पुरुषांसाठी फार आवश्यक आहे. हे पोषकतत्व वनस्पतींद्वारे तयार केले जातात. त्यामुळे आहारामध्ये लायकोपीनच्या स्त्रोतांचा समावेश करणे फार गरजेचं आहे. लायकोपीन हे अँटिऑक्सिडेंट आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी (Free radicals) लढण्याचे काम करते. लायकोपीन लिपिड प्रोटीन आणि डीएनएचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून बचाव करते. यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यातही हे पोषक तत्वं खूप फायदेशीर आहे तसेच यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.

✴️लायकोपीनचे फायदे

प्रजनन क्षमता सुधारते

⏩बिघडलेली जीवनशैली, चुकीचा आहार आणि प्रदूषणामुळे पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ लागतो. जगातील किमान 10 ते 15 टक्के लोकांना प्रजननक्षमतेशी संबंधित समस्या आढळतात. लायकोपीन हे पोषक तत्वं पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते.

✴️कर्करोगाचा धोका कमी होतो

⏩लायकोपीन पोषक तत्वं एक अँटिऑक्सिडेंट आहे. हे अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या डीएनए आणि पेशींच्या संरचनेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करून कर्करोगाचा धोका कमी करतात.

✴️प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होतो

⏩अलिकडे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. काही संशोधनानुसार, लायकोपीनच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. लायकोपीनची उच्च पातळी प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करू शकते.

✴️हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी

✴️लायकोपीन एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यात मदत करते. लायकोपीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.

✴️हाडे कमकुवत होण्यापासून बचाव

⏩कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के प्रमाणेच लायकोपीन अँडीऑक्सिडेंटदेखील हाडे मजबूत होण्यास मदत करते. लायकोपीन हाडांमधील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास देखील मदत करते. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे हाडांची रचना कमकुवत होते, म्हणून पुरुषांनी लायकोपीनयुक्त अन्न सेवन केले पाहिजे.

✴️’या’ पदार्थांमध्ये आढळते लायकोपीन :

◼️टोमॅटो हा लायकोपीनचा मुख्य स्त्रोत आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एक कप ताज्या टोमॅटोमध्ये 3041 मायक्रोग्रॅम लायकोपीन असते. ताजे टोमॅटो लाइकोपीनचा चांगला स्रोत आहे.

◼️पपई हे असे फळ आहे ज्यामध्ये लायकोपीन देखील आढळते. एका कप पपईमध्ये सुमारे 18028 मायक्रोग्रॅम लायकोपीन आढळते आणि यामध्ये कॅलरीजही खूप कमी असतात.

◼️पेरू हा लायकोपीनचा चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यासह ओमेगा-3 आणि फायबर देखील आढळतात. एका कप पेरूमध्ये 5204 मायक्रोग्रॅम लायकोपीन आढळते.

◼️कलिंगडामध्ये लायकोपीन आढळते तसेच यामुळे जे शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page