
चिपळूण : शहरातील संभाजीनगर परिसरात एका वृद्ध महिलेच्या टपरीतून सोन्याचे मंगळसूत्र चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी ३ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली असून, अज्ञात चोरट्याने ८८,५०० रुपये किमतीचे मंगळसूत्र लंपास केले आहे.
चिपळूण पोलीस ठाण्यात याप्रकरणी अनुसया गणेश पाटील (वय ६५, रा. मनोहर आंग्रे चाळ, संभाजीनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या टपरीमध्ये एका पाकिटात २२.७३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ठेवले होते.

अज्ञात चोरट्याने त्यांच्या नकळत आणि त्यांची संमती नसताना लबाडीच्या इराद्याने टपरीत ठेवलेले हे पाकीट चोरून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर पाटील यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजी १७:५४ वाजता भा.दं.वि. कलम ३०३(२) नुसार गु.र.नं. २००/२०२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
चिपळूण पोलीस सध्या अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत. सणासुदीच्या काळात अशा घटना घडत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर