खेड : दसरा- दिवाळी सणासाठी कोकण रेल्वे मार्गावर २० ऑक्टोबरपासून विशेष गाडी धावणार आहे.
यामुळे सणासुदीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे
गाडी क्र. ०११८५ / ०११८६ लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) (साप्ताहिक) विशेष गाडी क्रमांक ०११८५ लोकमान्य टिळक (टी) – मंगळुरु जं. (साप्ताहिक) विशेष लोकमान्य टिळक (टी) येथून २० ऑक्टोबर ते डिसेंबर पर्यंत दर शुक्रवारी १०.१५ वाजता सुटेल आणि मंगळुरू जंक्शनला ती दुसऱ्या दिवशी ६.०५ वाजता पोहचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०११८६ मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) (साप्ताहिक) विशेष मंगळुरू जंक्शन येथून दि. २१ ऑक्टोबर ते २ डिसेंबर पर्यंत दर शनिवारी ०६.४५ वाजता निघेल.
दुसऱ्या दिवशी ०२.२५ वाजता ती लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुक्काम येथे थांबेल. रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरथकल हे थांबे घेणार आहे. या गाडीला एकूण २१ कोच असतील. यात टू टियर – ०१ कोच, थ्री टियर एसी- ०५ कोच, स्लीपर- ०८ कोच, जनरल – ०५ डबे, स्लीपर – ०२ अशी तिची कोच रचना असेल.