मुंबई :- येत्या ऑक्टोबर महिन्यात म्हाडाच्या १० हजार घरांची सोडत निघणार आहे. काही दिवसांपूर्वीच म्हाडाच्या मुंबई मंडळातील ४०८२ घरांसाठी सोडत जाहीर झाली. ही सोडत जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी कोकण, पुणे तसेच औरंगाबाद येथील घरांबाबतही सोडत जाहीर करण्याबाबत विधान केले होते.
पुणे, कोकण, औरंगाबादमध्ये घराची संधी
यानुसार म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी येत्या ऑक्टोबरमध्ये १० हजार घरांसाठी सोडत काढण्याचा निर्णय घेतला आहे. यात पुणे, कोकण आणि औरंगाबाद मंडळाचा समावेश असणार आहे. त्यामुळे ज्यांना पुणे, कोकण अथवा औरंगाबाद या ठिकाणी आपले स्वत:चे हक्काचे घर घ्यावेसे वाटत असेल त्यांनी म्हाडाच्या सोडतीत नक्कीच अर्ज करावा.
म्हाडाच्या या १० हजार घराच्या सोडतीची जाहिरात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केली जाऊ शकते. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर २५ ऑगस्टपासून अर्जाची विक्री तसेच स्वीकृतीलाही सुरूवात होऊ शकते. म्हाडाच्या या सोडतीमध्ये अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्ही जर घर घेण्याची तयारी करत आहात तर म्हाडाची ही संधी तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
काही दिवसांपूर्वी मुंबईतील ४०८२ घरांसाठी म्हाडाकडून सोडत जाहीर करण्यात आली होती. मुंबईतील अंधेरी, जुहू, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली, विक्रोळी, घाटकोपर, पवई, ताडदेव सायन येथील ४०८२ घरांसाठी ही सोडत काढण्यात आली. २२ मे २०२३ मध्ये या घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.
जाहिरात