
नंदुरबार – नावात काय आहे, असे नेहमी म्हटले जाते. मात्र नावात थोडा जरी बदल झाला तरी तर अर्थाचा अनर्थ होतो, याचा प्रत्यय नंदुरबारवासीयांना येत आहे. महामार्गावरील दिशादर्शक फलकावरील जमाना या गावाच्या नावात कुणीतरी खोडसाळपणा करून ते जपान केले. त्यामुळे जपानला जाण्याचा रस्ता थेट नंदुरबारच्या सातपुडा पर्वतराजीतून जातो की काय, अशी मजेशीर चर्चा रंगली आहे.
फलकावरील चूक दुरुस्त करण्याची गरज असून अन्यथा सातपुड्यात पर्यटक जपान शोधत बसतील, असे म्हटले जात आहे. सातपुडा पर्वतराजीत वसलेल्या धडगाव तालुक्यात जमाना हे गाव आहे. याच गावासह विविध ठिकाणी जाण्यासाठी अक्कलकुवा तालुक्यातील डाब चौफुलीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने दिशादर्शक फलक लावला आहे. या दिशादर्शक फलकावरील जमाना या गावाच्या नावात अज्ञातांनी छेडछाड केली. त्यामुळे फलकावर जमाना ऐवजी जपान असे दिसत आहे.
जाहिरात

जाहिरात
