
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीचा निकाल जाहीर झाला असून राज्याचा एकूण निकाल 94 टक्के लागला आहे. राज्यातील 9 विभागनिहाय निकालही समोर आला आहे. कोणत्या विभागाचा निकाल सर्वाधिक लागला, चला जाणून घेऊया.
कोकणच निकालाचा राजा ! सलग तिसर्यांदा सर्वोच्च निकाल, निकाल येथे पहा… इयत्ता 10वीचा निकाल जाहीर..
मुंबई /प्रतिनिधी – 12 वीचा निकाला लागून अवघे काही दिवस उलटत असतानाच आज (13मे) इयत्ता 10वीचा निकालही जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेली 10वीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025 या कालावधीत पार पडली. त्यानंतर अवघ्या 2 महिन्यांतच 10वीचा निकाल लागला असून त्यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता अखेर शमली आहे. राज्यातील एकूण निकाल 94 टक्के लागला असून नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. सर्व विभागात कोकणने बाजी मारली असून कोकणचा एकूण निकाल 98.82 टक्के इतका लागला आहे. तर नागपूर विभागाच निकाल सर्वात कमी, म्हणजेच 90.78टक्के इतका लागला आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि रत्नागिरी अशी नऊ विभागीय मंडळं आहेत.
कोणत्या विभागाचा निकाल किती ?…
1) कोकण – 98.82 टक्के
2) कोल्हापूर – 96.87 टक्के
3) मुंबई – 95.84 टक्के
4) पुणे – 94.81 टक्के
5) नाशिक – 93.04 टक्के
6) अमरावती – 92.95 टक्के
7) छत्रपती संभाजीनगर – 92.82 टक्के
8) लातूर – 92.77 टक्के
9) नागपूर – 90.78 टक्के
मुलींनीच मारली बाजी…
यंदा 10वीच्या परीक्षेसाठी 15 लाख 46 हजार 579 विद्यार्थी बसले. त्यापैकी 14 लाख 55 हजार 477 विद्यार्थी पास झाले. म्हणजेच एकूण 94.10 टक्के विद्यार्थी पास झाले.
दरवर्षीप्रमाणेच यंदाही 10वीच्या निकालातही मुलींनीच बाजी मारली आहे. या वर्षी एकूण 96. 14 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर मुलांचा निकाल 92.31 टक्के इतका लागला आहे. मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 3.83 टक्क्यांनी अधिक आहे.
या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातील एकूण 16 लाख 10 हजार 908 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी 15 लाख 98 हजार 553विद्यार्थी बसले. 14 लाख 87 हजार 399 विद्यार्थी पास झाले. त्यांची टक्केवारी 93.04 टक्के इतकी आहे.
त्यामुळे फ्रेश विद्यार्थ्यांचा निकाल 94.10 टक्के तर सर्व विद्यार्थ्यांचा (खासगी, दिव्यांग, फ्रेश, पुनरपरीक्षार्थी) निकाल 93.04टक्के आहे.
10वीचे आधीचे निकाल …
मार्च 2022 मध्ये दहावीचा निकाल 96.94 टक्के निकाल लागला होता.
2023 साली 93.83 टक्के
2024 साली 95.81 टक्के
तर यंदाचा निकाल, 2025 94.10 टक्के निकाल लागला आहे.
गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी निकालाची टक्केवारी 1.71 टक्क्यांनी कमी झाली आहे.
किती विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण ?
राज्यात 10वीच्या निकालात 100 टक्के मिळवलेले 211 विद्यार्थी आहेत. त्यात पुण्यातील 12, नागपूरमधील 3, संभाजीनगरचे 40, मुंबईमधील 8, कोल्हापूरचे 12, अमरावतीमधील 11, नाशिकचे 2, लातूरचे 113 आणि कोकणच्या 9 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.