नवी दिल्ली- कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते मडगाव दरम्यान नेत्रावती व मत्स्यगंधा यार रेल्वे गाड्या दररोज रेल्वे कडून चालवल्या जातात. पण या रेल्वेला जिल्ह्यातील रत्नागिरी , चिपळूण, खेड अशा ठिकाणी थांबा आहे. संगमेश्वर हे रत्नागिरी जिल्ह्याचे मध्यवर्ती व महत्त्वाचे ठिकाण असून मारलेश्वर, करणेश्वर ,सप्तेश्वर, याव्यतिरिक्त अनेक पर्यटन स्थळ संगमेश्वर तालुक्यामध्ये आहेत . त्यामुळे चाकरमान्या व्यतिरिक्त पर्यटकही मोठ्या प्रमाणात सोमेश्वरला येतात . त्यामुळे नेत्रावती व मत्स्यगंधा रेल्वेला संगमेश्वर येथे थांबा मिळावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सोमवारी सकाळी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली.
नेत्रावती – मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांना संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात थांबा मिळणे ही
काळाची गरज आहे. संगमेश्वर तालुक्यात पर्यटनस्थळ व १९६ गावांचा हा तालुका असल्याने
वाढती प्रवासी संख्या पाहता संगमेश्वर रोड स्थानकात थांबणाऱ्या गाड्या अपुऱ्या आहेत. ही सर्व
गावे संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर अवलंबून आहेत. त्यामुळे या रेल्वे स्थानकावर सतत
प्रवाशांनी गजबजलेले असते.
नेत्रावती-मत्स्यगंधा एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळणेसंदर्भात निसर्गरम्य चिपळूण-
निसर्गरम्य संगमेश्वर फेस बुक ग्रुपने काही दिवसांपूर्वी बेमुदत उपोषणही केले होते. गेली तीन वर्षे
नेत्रावती-मत्स्यगंधा एक्स्प्रेस थांबा मिळणेसंदर्भात हा ग्रुप तीन वर्षे पाठपुरावा करीत आहेत. तसेच
या स्थानकातून कोकण रेल्वेला करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते.
लोकभावनेचा तसेच वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून नेत्रावती – मत्स्यगंधा एक्स्प्रेस
(अप-डाऊन) थांबा मिळणेबाबतचे सतत होणारे आंदोलन, या सर्व बाबी पाहता सदरचा थांबा
मिळणे गरजेचे असल्याने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर नेत्रावती – मत्स्यगंधा एक्स्प्रेस (अप-
डाऊन) गाड्यांना थांबा मिळावा, अशी आग्रही मागणी आमदार शेखर ने निकम यांनी रेल्वे मंत्रांकडे केली. सदर मागणीवर रेल्वेमंत्री आणि सकारात्मक दाखवले असून लवकर च्या संदर्भात निर्णय घेणार असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले आहे.
नेत्रावती व मत्स्यगंधा ट्रेनला थांबा मिळावा, यासह अन्य विषयांवर या वेळी आमदार शेखर निकम यांनी ना. रावसाहेब दानवे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
यावेळी अजितदादा पवार राष्ट्रवादीचे बाबाजीराव जाधव, जिल्हा बँक संचालक राजू सुर्वे, राष्ट्रवादीचे नेते अजित यशवंतराव, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव आदी उपस्थित होते. आमदार शेखर निकम यांच्या निवेदनावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.