लोकसभा सार्वत्रिक निवडणूक रत्नागिरी लोकसभेसाठी प्रत्येकी 14 टेबलवर फेरीनिहाय होणार मतमोजणी..

Spread the love

रत्नागिरी, राजापूर प्रत्येकी 25, चिपळूण, कणकवली 24, सावंतवाडी 22 तर कुडाळ 20 फेऱ्या

रत्नागिरी, दि. 29 मे 2024: 46-रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची मतमोजणी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय 14 टेबलवरती फेरीनिहाय होणार आहे. रत्नागिरी, राजापूर मतदार संघाच्या प्रत्येकी 25 फेऱ्या, चिपळूण, कणकवली प्रत्येकी 24 फेऱ्या, सावंतवाडी 22 फेऱ्या तर, कुडाळ मतदार संघात 20 फेऱ्या होणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

मिरजोळे एमआयडीसीतील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात ही मतमोजणी सकाळी 8 वा. सुरु होणार आहे. टपाली मतदान मतमोजणीसह प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एकाच वेळी मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.

265 चिपळूण विधानसभा मतदार संघात 336 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 266 रत्नागिरी विधानसभा मतदार संघात 345 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 267 राजापूरमध्ये 341 मतदान केंद्र असल्याने 14 टेबलवर 25 फेऱ्यांमध्ये मजमोजणी होणार आहे. 268 कणकवली विधानसभा मतदार संघात 332 मतदान केंद्र असल्याने 24 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे. 269 कुडाळ विधानसभा मतदार संघात 278 मतदान केंद्र असल्याने 20 फेऱ्यांमध्ये तर, 270 सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 308 मतदान केंद्र असल्याने 22 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे.

मतमोजणी प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास निर्बंध

मतमोजणीसाठी येणाऱ्या उमेदवारांच्या प्रतिनिधींना प्रत्यक्ष मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल आणता येणार नाही. याठिकाणी मोबाईल वापरावर भारत निवडणूक आयोगाने संपूर्णपणे निर्बंध घातला आहे. याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page