नाटे पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी करणाऱ्या 4 आरोपीना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक…

Spread the love

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक, श्री. धनंजय कुलकर्णी यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नजीकच्या काळात घडलेल्या घरफोडी-चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टीने एक विशेष मोहिम राबविणेबाबत सूचना दिल्या होत्या.

पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक, श्री. नितीन ढेरे यांनी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घडलेल्या घरफोडी-चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतला व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली.

त्याच दरम्यान दि. २०/०८/२०२४ रोजी नाटे पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री नाटे-बाजारपेठ येथील “झैद मोबाईल व इलेक्टॉनिक्स” या दुकानाचे शटर कोणत्यातरी हत्याराने उचकटवून, शटर उघडून आत प्रवेश करुन, दुकानातून एकूण ४९ मोबाईल ऍन्डसेट, टॅब व अन्य साहीत्य असा एकूण ६,८३,700/- रु. किंमतीचा मुद्देमाल चोरीस गेलेला होता.

या दुकानाचे मालक श्री. नासिर इब्राहिम काझी, रा. जैतापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदरबाबत नाटे पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ६९/2024, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम ३०५(अ), ३३१(३), ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समांतर तपास चालू असताना, गोपनिय बातमीच्या आधारे तसेच नाटे परिसरातील कंत्राटी बांधकाम करणात्या काही इसमांकडे केलेल्या चौकशीमध्ये सदर गुन्ह्यातील आरोपीत हे कर्नाटक राज्यात व मुंबई येथे असल्याची खात्रीशीर माहिती समजून आल्याने, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांनी लागलीच दोन पथके तयार करून कर्नाटक राज्य व मुंबई या ठिकाणी तपासा करीता पाठविण्यात आली.

सदर पथकांकडून कर्नाटक राज्य व मुंबई येथे तपास चालू असताना, कर्नाटक राज्यात एका तपास पथकाने (1) करण हाज्याप्पा पुजारी, वय २६ वर्षे, रा. बाजनगर, सुबानाईक तांडा, नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक, (२) राहूल रेड्डी चव्हाण, वय २४ वर्षे, रा. बलराम चौक, तलाई तांडा, जि. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक यांचा गुलबर्गा, कर्नाटक येथे शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले व मुंबई या ठिकाणी गेलेल्या तपास पथकाने (३) प्रेम सपन कर्माकर, वय २२ वर्षे, रा. मोतीला नगर, नंबर १ रोड, गोरेगाव वेस्ट, दत्त मंदीराजवळ, रुम नं. ५०४, मुंबई याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले तसेच सदर ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीकडून मिळालेल्या अधिक माहितीच्या आधारे (४) सबन्ना भिमराय कोबळा, वय २४ वर्षे, रा. नलवार, ता. चितापूर, जि. गुलबर्गा, रा. कर्नाटक यास नाटे पोलीस ठाणे हद्दीमधून ताब्यात घेण्यात आलेले आहे.

सदर चारही आरोपीत यांचेकडून गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी एकूण ४,१३,१७७/- रु. किंमतीचे ३३ मोबाईल हॅन्डसेट, १ टॅब असे साहीत्य जप्त करण्यात आलेले आहे.

▪️या गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.

सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे नूतन पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांचे मार्गदर्शना खाली नाटे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहा. पोलीस निरीक्षक श्री. अविनाश केदारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री. तानाजी पवार, पोलीस उपनिरीक्षक श्री. कर्मराज गावडे, पो.हवा श्री. सुभाष भागणे, पो.हवा श्री. शांताराम झोरे, पो.हवा श्री. नितीन ढोमणे, पो.हवा श्री. बाळू पालकर, पो.हवा श्री. विक्रम पाटील, पो.हवा श्री. अमित कदम, पो.हवा श्री. प्रविण खांबे, पो.हवा श्री. गणेश सावंत, पो.हवा श्री. रमिज शेख, चालक पो.शि श्री. अतुल कांबळे तसेच नाटे पोलीस ठाणे मधील पो.हवा श्री. राकेश बागुल व पोशि. चव्हाण यांनी केली आहे. सदर कारवाईबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page