पुणे : कोकण घाटमाथा आणि विदर्भात पुढील दोन दिवस हलका पाऊस होण्याचा अंदाज असून, पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचे पहिले दहा दिवस कोरडे जाण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, मोसमी वाऱ्यांचा पश्चिम – पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण छत्तीसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी झाली आहे.
ऑगस्टमधील पावसाच्या खंडाची कारणे काय?
- मोसमी वाऱ्यांचा पश्चिम – पूर्व कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला
- दक्षिण छत्तीसगडवरील कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी
- वातावरणाच्या वरच्या थरात दोन विरुद्ध दिशेने जाणाऱ्या वाऱ्यामधील क्षेत्र (शिओर झोन) दक्षिणेकडे सरकले
- बंगालच्या उपसागरात ढग नसणे
- एल-निनो सक्रिय; पण त्याचा मोसमी पावसावर परिणाम नाही
- इंडियन ओशन डायपोल (आयओडी) तटस्थ स्थितीत
जाहिरात