
राष्ट्रीय मिती कार्तिक १९, शक संवत १९४५, आश्विन, कृष्ण, द्वादशी, शुक्रवार, विक्रम संवत २०८०. सौर कार्तिक मास प्रविष्टे २५, रबी-उल्सानी-२५, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १० नोव्हेंबर २०२३. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमन्त ऋतु. राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत.
द्वादशी तिथी दुपारी १२ वाजून ३६ मिनिटापर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ. हस्त नक्षत्र अर्धरात्रौ १२ वाजून ८ मिनिटापर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ. विष्कुंभ योग सायं ५ वाजून ५ मिनिटापर्यंत प्रीति योग प्रारंभ. तैतिल करण दुपारी १२ वाजून ३६ मिनिटापर्यंत त्यानंतर वणिज करण प्रारंभ. चंद्रमा दिवस रात्र कन्या राशीत संचार करेल.
▪️सूर्योदय: सकाळी ६-४४,
▪️सूर्यास्त: सायं. ६-०१,
▪️चंद्रोदय : पहाटे ३-५५,
▪️चंद्रास्त: सायं. ४-०६,
▪️पूर्ण भरती: सकाळी ९-५२
पाण्याची उंची ३.७१ मीटर,
रात्री १०-३८
पाण्याची उंची ३.८९ मीटर,
▪️पूर्ण ओहोटी: पहाटे ३-४१
पाण्याची उंची १.९० मीटर,
सायं. ४-०५ पाण्याची उंची १.११ मीटर.

🔹️दिनविशेष: प्रदोष, गुरुद्वादशी, धनत्रयोदशी, यमदीपदान, धन्वंतरी जयंती.
🔹️आजचा शुभ मुहूर्त:
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ५४ मिनिटे ते ५ वाजून ४७ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५३ मिनिटे ते दुपारी २ वाजून ३७ मिनिटापर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ३९ मिनिटे ते १२ वाजून ३२ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सायं ५ वाजून ३० मिनिटे ते ५ वाजून ५७ मिनिटापर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून २२ मिनिटे ते १० वाजून ४३ मिनिटापर्यंत राहील.
🔹️आजचा अशुभ मुहूर्त :
राहुकाल सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते १२ वाजेपर्यंत. सकाळी ७ वाजून ३० मिनिटे ते ९ वाजेपर्यंत गुलिक काळ राहील. दुपारी ३ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ सकाळी ८ वाजून ५० मिनिटे ते ९ वाजून ३३ मिनिटापर्यंत त्यानंतर १२ वाजून २६ मिनिटे ते १ वाजून १० मिनिटापर्यंत.
🔹️आजचा उपाय
आज धन्वंतरि भगवान, कुबेर, माता लक्ष्मीची परंपरेनुसार पूजा करा आणि यमाच्या नावाचा एक दिवा दक्षिण दिशेने लावा.