ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण ‘ईटीव्ही भारत’वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.
*मेष (ARIES) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. विचारांच्या गतिशीलतेमुळं द्विधा मनःस्थिती होईल आणि त्यामुळं कोणत्याही निर्णयाप्रत आपण येऊ शकणार नाही. आजचा दिवस नोकरी-व्यवसायात स्पर्धेचा राहील आणि त्यात यशस्वी होण्याचा आपण प्रयत्न कराल. त्यातून सुद्धा नवे कार्य सुरू करण्याची प्रेरणा मिळेल आणि ते सुरूही करता येईल. एखादा प्रवास संभवतो. आजचा दिवस लेखन कार्यास अनुकूल आहे. बौद्धिक आणि तार्किक विचार-विनिमय करण्यास संधी मिळेल.
*वृषभ (TAURUS) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज द्विधा मनःस्थितीमुळं केलेल्या व्यवहारात आपण अडचणीत येऊ शकता. त्यातून बाहेर पडण्यासाठी महत्वाचा वेळ खर्च करावा लागेल. आपला हट्टी स्वभाव न सोडल्यास कोणाशी चर्च दरम्यान संघर्ष होऊ शकतो. आज आखलेला प्रवासाचा बेत पूर्ण होणार नाही किंवा रद्द करावा लागेल. आज लेखक, कारागीर आणि कलाकारांना आपली प्रतिभा व्यक्त करण्याची संधी मिळेल. आपल्या सुमधुर वाणीनं एखाद्याची समजूत घालू शकाल. अनुकूल स्थिती नसताना नवीन कामाची सुरुवात न करणे हितावह राहील.
*मिथुन (GEMINI) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजच्या दिवसाचा प्रारंभ शरीर आणि मनाच्या टवटवीतपणामुळं चांगला होईल. मित्र व कुटुंबीयांसह घरात किंवा बाहेर मनपसंत भोजनाचा आनंद लुटाल. सुंदर कपडे परिधान करून बाहेर जाल. आर्थिक लाभाची संधी आहे. मनात कोणत्याही प्रकारच्या नकारात्मक विचारांना थारा न देणे किंवा ते दूर करणे हितावह राहील. कोणत्याही परिस्थितीत मन संयमित ठेवा.
*कर्क (CANCER) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज मनःस्थिती त्रिशंकू अवस्थेत असल्यामुळं कोणताही महत्वाचा निर्णय आपण घेऊ शकणार नाही. संबंधित व्यक्तींशी मतभेद संभवतात. प्रापंचिक कार्यावर खर्च होईल. वाणीवर संयम ठेवावा लागेल. मनातील साशंकता दूर करावी लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे.
*सिंह (LEO) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. कोणत्याही गोष्टीत खंबीर मनाने निर्णय घेऊ न शकल्याने समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही. मन विचारांत अडकून पडेल. मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल. व्यापारात फायदा होईल. मनःस्थिती चांगली नसल्यानं महत्त्वाचे निर्णय आज घेऊ नये. संततीशी चर्चा होईल. स्वादिष्ट भोजनाचा लाभ मिळेल.
*कन्या (VIRGO) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. सांप्रतकाली नव्या कामासंदर्भातील नियोजन योग्य प्रकारे करू शकाल. व्यापारी व नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस लाभदायी आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता आल्यामुळं बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचं वातावरण राहील. कौटुंबिक जिव्हाळा वाढेल. पित्याकडून लाभ होण्याची शक्यता आहे.
*तूळ (LIBRA) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. संततीविषयक काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. एखादा प्रवास संभवतो. लेखन आणि साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद संभवतात.
*वृश्चिक (SCORPIO) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. सध्या शांत राहून वेळ घालवावा लागेल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. अवैध कामांपासून दूर राहावे. नवे संबंध विचारपूर्वक प्रस्थापित करा. जास्त पैसे खर्च झाल्यानं आर्थिक चणचण भासेल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. खाण्या- पिण्याविषयी काळजी घ्यावी लागेल. शारीरिक आणि मानसिक बेचैनी जाणवेल. शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
*धनू (SAGITTARIUS) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस बौद्धिक आणि तार्किक विचार-विनिमयासाठी अनुकूल आहे. सामाजिक सन्मान होतील. मित्रांचा सहवास लाभेल. त्यांच्यासह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. स्वादिष्ट भोजन आणि सुंदर वस्त्र लाभल्यानं मन प्रसन्न राहील. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. भिन्नलिंगी वक्तींच्या सहवासात वेळ चांगला जाऊ शकेल. भागीदारी लाभदायी होईल.
*मकर (CAPRICORN) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. व्यापारातील प्रगतीसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. व्यवसायात आपण ठरविल्या प्रमाणे काम करु शकाल. आर्थिक देवाण-घेवाणीत सुद्धा यश मिळवू शकाल. व्यापारी कामात विघ्न येईल. स्वास्थ्य उत्तम राहील. घरात सुख-शांतीचं वातावरण राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य सुद्धा मिळवू शकाल.
*कुंभ (AQUARIUS) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आपले विचार व बोलणं ह्यात बदल होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल. लेखन व सृजनात्मकता ह्यातून आनंद मिळेल. अचानक खर्च उदभवतील. अपचन आणि अजीर्ण अशा आजारातून स्वास्थ्य बिघडू शकते.
*मीन (PISCES) :* आज चंद्र मिथुन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज आपल्यात स्फूर्ती आणि उत्साहाचा अभाव असल्याचं दिसून येईल. शक्यतो कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत. शरीर आणि मन अस्वस्थ राहील. अप्रिय घटनांतून आपले मन दुःखी होईल. नोकरीत काळजीचं वातावरण राहील. पैसा आणि कीर्ती ह्यांची हानी संभवते.