आज लक्ष्मीपूजन जाणून घेऊया ‘या’ राशींना धनप्राप्तीसाठी अनुकूल दिवस, आर्थिक अडथळेही होतील दूर; वाचा राशीभविष्य…

Spread the love

पाच दिवसाच्या ‘दिवाळी’ (Diwali) सणाला सुरूवात झाली आहे. कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील, तसेच आजचं राशीभविष्य कसं असेल जाणून घेऊ आजच्या9 राशीभविष्यात.

*मेष (ARIES) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहाव्या स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. घरातील वातावरण आनंदी राहील. आर्थिक लाभ संभवतात. व्यवसायातील प्रगती समाधान कारक असेल. सामाजिक पत-प्रतिष्ठा वाढेल. मित्र आणि कुटुंबियांसह सहलीस जाऊ शकाल. वस्त्रालंकार लाभतील.

*वृषभ (TAURUS) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचव्या स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अचानकपणे खर्च करावे लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. कौटुंबिक वातावरणात आनंद पसरेल. आरोग्यात सुधारणा होईल. कार्यात यशस्वी व्हाल. नोकरी-व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल.

*मिथुन (GEMINI):* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. संपत्ती विषयक दस्तावेजात फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी विनाकारण वाद होतील. संततीविषयक चिंता निर्माण होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी निर्माण होतील. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचा सहवास घडल्यानं आपणास आनंद होईल, इतकीच काय ती जमेची बाजू असेल.

*कर्क (CANCER) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहील. गूढ विद्येची आवड निर्माण होईल. दुपारनंतर काही ना काही कारणानं चिंतीत व्हाल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खर्चात वाढ होईल.

*सिंह (LEO) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सकाळी आपल्या गोड बोलण्यानं इतरांकडून आपली कामे करवून घ्याल. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. दुपारनंतर आप्तेष्टांकडून काही लाभ संभवतो. मित्रांचा सहवास घडेल. विरोधकांशी दोन हात करू शकाल. संबंधातील प्रेमळपणामुळं आपला स्वभाव मृदु होईल.

*कन्या (VIRGO) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपल्या प्रभावी वक्तृत्वाने आपण प्रेमळ व लाभदायी संबंध प्रस्थापित करू शकाल. आपले विचार इतरांना पटवून देऊ शकाल. व्यवसायात फायदा होईल. मन आनंदित राहील. आर्थिक लाभ संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. बौद्धिक चर्चेत सहभागी होऊ शकाल.

*तूळ (LIBRA) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बाराव्या स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक, मानसिक अस्वास्थ्यामुळं मित्रांशी वाद होण्याची शक्यता आहे. कोर्ट-कचेरीपासून शक्यतो दूर राहणं हितावह राहील. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या वक्तृत्वानं इतरांची मने जिंकाल.

*वृश्चिक (SCORPIO) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. आज अनेक प्रकारचे लाभ आपणास मिळू शकतील. आपली कीर्ती वाढेल. धनप्राप्ती होईल. मित्रांसाठी पैसे खर्च होतील. त्याच बरोबर त्यांच्यासह फिरण्याचा आनंद लुटू शकाल. दुपारनंतर मात्र, शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणवेल. एखाद्याशी वाद संभवतो. स्वभावात तापटपणा वाढेल.

*धनू (SAGITTARIUS) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. कौटुंबिक आणि व्यावसायिक वातावरण समाधानाचं राहील. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात लाभ होईल. सरकारी कामातून लाभ होतील. अनेक क्षेत्रात यश आणि कीर्ती लाभेल. व्यापारात वृद्धी होईल. एखाद्या सहलीस जाऊ शकाल.

*मकर (CAPRICORN) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. परदेशातील नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळाल्यानं आपण आनंदित व्हाल. प्रवास संभवतो. कामासंबंधी एखादी योजना आकार घेईल. व्यापारात फायदा होईल.

*कुंभ (AQUARIUS) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण जर आपल्या रागावर आणि वाणीवर संयम ठेवलात तर आजचा दिवस आपण आनंदात घालवू शकाल. कुटुंबियांशी संभाव्य वाद टाळू शकाल. दुपारनंतर मित्रांच्या सहवासात आनंदात वेळ घालवू शकाल. प्रवास संभवतो. विदेशातून एखादी चांगली बातमी ऐकिवात येईल.

*मीन (PISCES) :* आज चंद्र कन्या राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. दैनंदिन कामे शांततेत पूर्ण होतील. मित्रांसह एखाद्या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. भागीदाराशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतील. दुपारनंतर मात्र, प्रकृतीत अचानकपणे काही बिघाड होईल. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. आर्थिक खर्च वाढतील. अपघाताची शक्यता असल्यानं पाण्यापासून शक्यतो दूर राहावं.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page