हा संकल्प म्हणजे गणेशोत्सवात करावयाचे व्रत आहे. हे व्रत पूर्ण कुटुंबाने करायचे असल्यामुळे त्याची कुटुंबात चर्चा करून संकल्प घ्यावा. तसेच आपल्या नातेवाईक, शेजारी, सोसायटी आणि मित्रमंडळींनासुद्धा आग्रह करावा. सोशल मीडियाचाही जास्तीतजास्त वापर करावा.
मी संकल्प करतो की गणेशोत्सवात गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी काळात…
१. नवीन पॉलिथीन पिशवी फळे, भाजी-फुलांकरीता घरी आणणार नाही. त्याऐवजी कापडी पिशवीचा वापर करणार.
२. पॉलिथीनचे लहान तुकडे जसे मसाल्याचे, चॉकलेट रॅपर्स, कुरकुरे पाकीट इत्यादी प्लॅस्टिक बॉटल मध्ये बंद करून इकोब्रीक करेन. पॉलिथीन कचऱ्यात टाकणार नाही.
३. वापरा आणि फेकून द्या (Single use Plastic) असे डिश, ग्लास आणि द्रोण वापरणार नाही.
४. गणेशोत्सव सजावटीत प्लॅस्टिक किंवा थरमाकोल वापरणार नाही.
५. सजावटीकरिता प्लॅस्टिक फुले-पाने नव्याने विकत घेणार नाही.