आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ या राशीभविष्यात.
*मेष (ARIES) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विचार एकदम बदलतील त्यामुळं महत्त्वपूर्ण कार्यात अंतीम निर्णय घेणं जमणार नसल्यानं आज कोणताही निर्णय न घेणं हितावह राहील. कामानिमित्त किंवा काही कारणास्तव प्रवास करावा लागेल. लेखनकार्य करण्यास दिवस अनुकूल आहे. बौद्धिक आणि तार्किक विचार विनिमय होईल. कोणत्याही स्त्रीशी वाद घालू नका.
*वृषभ (TAURUS) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी असेल. आज चंचल मनःस्थितीमुळं हाती आलेली संधी गमावून बसाल. समजूतदारपणा दाखविल्यास कोणाशी संघर्ष होणार नाही. प्रवासात अडचणी येण्याची शक्यता आहे. लेखक, कलाकार तथा सल्लागार ह्यांच्यासाठी दिवस अनुकूल आहे. नवे काम आरंभ करण्यात अडचणी येतील.
*मिथुन (GEMINI) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिकदृष्टया लाभदायी आहे. स्वादिष्ट आणि रूचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मानसिकदृष्टया दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. प्रकृती उत्तम राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल. भेटवस्तू मिळाल्यानं आनंद होईल. नकारात्मक विचार मनात येऊ न देणं हितावह राहील.
*कर्क (CANCER) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील आणि त्यामुळं मानसिकदृष्टया आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहिल्यानं महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडं दुर्लक्ष केल्यानं प्रकृती बिघडेल. कोर्ट-कचेरीतील कामे जपून करा. मानहानी आणि धनहानी होण्याची शक्यता आहे.
*सिंह (LEO) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. मित्राकडून लाभाची शक्यता आहे. रम्य स्थळी प्रवासाला जाल. निर्णय न घेण्याच्या वृत्तीमुळं हाती आलेली संधी गमावून बसाल म्हणून महत्वाचे निर्णय लांबणीवर टाकणे हितावह राहील. विचार करण्यात खूप वेळ जाईल. आर्थिक लाभ संभवतात.
*कन्या (VIRGO) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नव्या कार्याचे बेत तडीस जातील. व्यापारी व नोकरदारांसाठी दिवस अनुकूल आहे. व्यापारात फायदा आणि नोकरीत बढतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ संभवतात. घरात आनंदी वातावरण राहील.
*तूळ (LIBRA) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात असेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ संभवतात. नोकरी आणि व्यापारात सहकारी सहकार्य करणार नाहीत. दूरवरच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. लेखनकार्य आणि बौद्धिक क्षेत्रात सक्रिय राहाल. परदेशातून मित्र आणि नातलगांकडून आनंददायी बातमी मिळेल. शारीरिक अस्वास्थ्य राहील.
*वृश्चिक (SCORPIO) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस शांततेत आणि सावधानतेत घालवावा लागेल. नवीन कामात अपयशी होण्याची शक्यता असल्यानं आज नवीन कामे सुरू न करणं हितावह राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. सरकार विरोधी प्रवृतीपासून दूर राहणं हितावह राहील. खर्च वाढल्यानं आर्थिक संकटाची सुद्धा शक्यता आहे.
*धनू (SAGITTARIUS) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी असेल. आजचा दिवस आनंदात जाईल. मनोरंजनाच्या प्रसंगातून मन आनंदी राहील. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासातून आनंद मिळेल. मित्रांसह एखादा प्रवास, एखादी सहल ठरवाल. लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. भागीदारीतून फायदा होईल.
*मकर CAPRICORN) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या असेल. आजचा दिवस व्यापार-व्यवसायास अनुकूल आहे. व्यापार वृद्धी होईल. आर्थिक व्यवहार यशस्वीपणे होतील. घरातील वातावरण आनंदी राहील. योग्य ठिकाणीच पैसा खर्च होईल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. व्यापार्यांना कायदेशीर त्रास संभवतो. परदेशाशी व्यापार वाढेल. शत्रूवर मात कराल. आरोग्य उत्तम राहील.
*कुंभ (AQUARIUS) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी असेल. आज कोणत्याही नवीन कामाची सुरुवात न करणं हितावह राहील. विचारात सतत बदल होत असल्याचं दिसून येईल. महिलांनी बोलण्यावर संयम ठेवावा. प्रवास शक्यतो टाळावेत. संततीविषयी काळजी राहील. लेखन आणि नवनिर्माण ह्या कामासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक चर्चेत सहभागी होण्याची संधी मिळेल. अचानक खर्च उदभवतील. पोटाचे विकार संभवतात.
*मीन (PISCES) :* आज चंद्र मिथुन राशीस स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी असेल. आजचा दिवस मना विरुद्ध गोष्टी घडण्याचा आहे. त्यामुळं आपला उत्साह मावळेल. कुटुंबात वाद संभवतात. आईचे स्वास्थ्य बिघडून चिंता निर्माण होईल. मन नाराज राहील. स्वास्थ्य बिघडल्यानं झोप लागणार नाही. स्त्रियांशी काळजी पूर्वक व्यवहार करावेत. पैसा आणि कीर्ती ह्यांची हानी संभवते. नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल. स्थावर मालमत्ता, वाहन इत्यादींशी संबंधित दस्तावेजात काळजी घ्यावी.