चिपळूण : नवकोंकण एज्युकेशन सोसायटीच्या डीबीजे वरिष्ठ महाविद्यालयात महिला विकास कक्षतर्फे ‘लैंगिक छळ व जागरूकता’या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. चिपळूणचे पोलिस निरीक्षक अनुराधा मेहर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते
मुलींना विशाखा ऍक्ट हा कसा सुरू करण्यात आला तसेच प्रत्येक शासकीय -अशासकीय संस्थेमध्ये हा कायदा अनिवार्य आहे. समाजात वावरत असताना महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाचे शोषण कसे होते. हे शोषण रोखण्यासाठी कायद्यात असलेल्या तरतुदींची माहिती दिलीत्यांनी दिली. सध्या सायबर क्राईमचे खूप गुन्हे नोंदवले जात आहेत. त्यासाठी मुलींनी मोबाईल फोन वापरताना काय काळजी घ्यावी हे समजावून सांगितले.
या कार्यक्रमात महाविद्यालयातील ८३ विद्यार्थिनीनी सहभाग घेतला. या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. माधव बापट, महिला विकास कक्षाच्या प्रमुख प्रा. सौ. प्रिया काटदरे तसेच महिला विकास कक्षाच्या सहकारी. सौ. सई सुर्वे, प्रा. अतूफर नाईक, प्रा. सौ. शिल्पा भिडे, प्रा. प्रतीक्षा चिपळूणकर, प्रा. सौ. अर्चना कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्राजक्ता पिसे यांनी केले तर आभार प्रा. सौ. शितल वाटवडेकर यांनी मानले.