
संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या तांबेडी गावांमध्ये युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद यांच्या माध्यमातून महिलांच्या रोजगारांचा प्रश्न मार्गी लागला असून सतीश धांगडे आणि सिद्धेश ब्रीद यांच्या संकल्पनेतून श्री.नवलाई पापड उद्योग समूहाचे आज शुभारंभ करण्यात आले. या उद्योगाचे उद्घाटन सिद्धेश ब्रीद यांच्या मातोश्री सौ.ब्रीद यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आली. या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील अनेक मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
. सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांच्या संकल्पनेतून अनेक वेगवेगळे उपक्रम कडवई तसेच कसबा जिल्हा परिषद गटात राबवले जात आहेत. सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करण्यासाठी सिद्धेश ब्रीद आता पुढे आले आहेत. लोकांना हस्ते परस्ते मदत करून शैक्षणिक,आरोग्य,कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रात सिद्धेश ब्रीद एक देवदूतसारखे काम करत आहे.नुकतेच त्यांच्या संकल्पनेतून तसेच सतीश धनावडे आणि त्यांच्या कुटूंबातील सदस्यांकडून आज तांबेडी गावातील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात यश आले आहे.सतीश धनावडे यांच्या माध्यमातून आणि कल्पनेतून सदरील माल मुबंई आणि पुना बाजारपेठेत विकला जाणार आहे.त्याच्या माध्यमातून मार्केटिंगची सर्व जबाबदारी सतीश धांगडे यांनी घेतली आहे.या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सिद्धेश ब्रीद,पत्रकार तथा नवनिर्मिती फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान गोलंदाज,पत्रकार सत्यवान विचारे,धनाजी भांगे,बाळकृष्ण कासार, नवलाई पापड उद्धोजक सतीश धांगडे,काजू व्यावसायिक रवींद्र ब्रीद,व्यावसायिक प्रकाश ब्रीद,प्रदीप सोलकर,माजी सरपंच प्रतीक्षा इचले, नरेश गोसावी,उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व गावकर सांगळे, गणपत कांबळे
आदी मान्यवर उपस्थित होते.