
भाजपा नेत्या उल्का विश्वासराव यांच्या प्रयत्नांना मोठे यश…
मुंबई जुलै २६, २०२३.
▪️भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर-लांजा-साखरपा विधानसभेची सूत्रे सौ. राजश्री (उल्का) विश्वासराव यांच्याकडे सोपवली. पक्ष नेतृत्त्वाचा हा विश्वास सार्थ ठरवताना आज त्यांनी भाजपाचा पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस पक्षाचा लांजा तालुक्यातील प्रभावी चेहरा, ग्रामपंचायत रिंगणेचे विद्यमान सरपंच श्री. संजय आयरे यांना भारतीय जनता पक्षात आणले आहे. संजय आयरे रत्नागिरी काँग्रेसच्या सहकार विभागाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. आज मुंबई येथे कोकणचे नेते, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत श्री. आयरे यांनी पक्षप्रवेश केला.

▪️मागील अनेक दिवस सौ. राजश्री विश्वासराव राजापूर विधानसभेत भेटीगाठी घेत असून “आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली भारतीय जनता पार्टी केंद्रात पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने सरकार बनवत आहे.” असा विश्वास प्रत्येक ठिकाणी व्यक्त करतात. काँग्रेसची गोंधळलेली स्थिती आणि विरोधकांच्या एकजूटीतील मतभेद यांमुळे काँग्रेस पक्ष स्पर्धेत मागे असून काँग्रेसमधील सुजाण, सेवाव्रती आणि मोदीजींच्या कार्यपद्धतीवर विश्वास असणाऱ्या समाजधुरीणांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजाप्रती आपले कर्तव्य करण्याचे आवाहन त्यांनी वेळोवेळी केले. या आवाहनाला प्रतिसाद देत श्री. संजय आयरे व त्यांच्या समर्थकांनी पक्षप्रवेश केला आहे.
▪️संजय आयरे हे स्वतः पदवीधर असून शैक्षणिक क्षेत्रात त्यांना विशेष रुची आहे. याशिवाय विविध स्थानिक सहकारी संस्थांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम करत असताना आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवत उल्लेखनीय योगदान दिले आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय क्षेत्रातील वाटचाल केली असून त्यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. शासकीय भरतीपूर्वी अकादमीच्या माध्यमातून प्रशिक्षण शिबिरे राबवत असल्याने तालुक्यातील अनेक तरुणांच्या आयुष्याला योग्य दिशा मिळाली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी ना. रविंद्र चव्हाण म्हणाले, “आयरेंसारखे कर्तबगार व्यक्तिमत्त्व भाजपामध्ये प्रवेश करत असल्याने लांजा तालुक्यात संघटनेला निश्चित उभारी मिळेल. अभ्यासू, मेहनती व संयमी स्वभावाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाची खरी ताकद आहेत. यांच्या जोडीला भाजपाच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेऊन येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचे स्वागत करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.”
▪️यावेळी संजय आयरेंसोबत श्री. शामराव कांबळे (सदस्य, ग्रा.पं. रिंगणे), श्री. रमेश धुळप, श्री. शशिकांत आयरे, श्री. सौरभ आयरे, श्री. रमेश धुळप (मा. सदस्य, ग्रा.पं. रिंगणे), श्री. अनिल राजीवले, श्री. विलास आयरे, श्री. महेश वाडेकर (मा. सरपंच, ग्रा.पं. रिंगणे), श्री. सुनील पेडणेकर, श्री. सुधाकर आयरे, श्री. विकास पांचाळ, श्री. विकास आयरे, श्री. उत्तम पांचाळ, श्री. अनिकेत आयरे आदी कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. श्री. संजय आयरे व समर्थकांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा रत्नागिरी काँग्रेससाठी मोठा धक्का असून यामुळे लांजा तालुका काँग्रेसमध्ये खिंडार पडले आहे.