सुदैवाने दोन विमानांची धडक टळली; दोषी कर्मचा-याचे निलंबन; मुंबई विमानतळावरील घटना
मुंबई विमानतळावर विमानांच्या लॅंडिंग आणि टेकऑफचा थरार घडल्याचा व्हिडीओ समोर आला. ज्यात एकाच धावपट्टीवरून एअर इंडिया(Air India)चे विमान 320 टेक ऑफ करताना इंडिगो(IndiGo)चे 6E 6053 विमान धोकादायक लॅंडिंग करताना दिसले. इंडिगोच्या पायलटने घेतलेल्या या रिस्की लॅंडिंगमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
व्हिडिओमध्ये, एअर इंडियाचे विमान धावपट्टीवरून निघाल्यानंतर काही मिनिटांत इंडिगोचे विमान खाली उतरताना दिसले. दरम्यान, ही घटना मुंबई विमानतळाच्या ATC कडून विमानाच्या लॅँडिंग दरम्यान मिळालेल्या चुकीच्या क्लिअरन्समुळे घडली. ज्यात कारवाई करत डीजीसीएकडून दोषी एटीसी कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी मुंबई विमानतळावर घडली. ज्यात एअर इंडियाचे विमान टेक ऑफच्या तयारीत असताना इंडिगोच्या विमानाने मिळालेल्या चुकीच्या क्लिअरन्समुळे रनवे 27 वर लँडिंग केले होते. दरम्यान, या घटनेत पायलच्या तप्तरतेमुळे अनेकांचा जीव बचावला. अन्यथा मोठी दुर्घटना ही अटळ होती.