
चिपळूण दि ४ जून- सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी असलेल्या एसटीला ७७ वर्षे पूर्ण होत असल्याने रविवारी चिपळूण आगारात वर्धापन दिन कार्यक्रम उत्साहात झाला. बसस्थानकात प्रवाशांनी केक कापून ‘लालपरीचा वर्धापनदिन साजरा केला.
या निमित्त बसस्थानकासह एसटी बसेस सजवण्यात आल्या होत्या. या वेळी वर्धापन दिनानिमित्त आगारप्रमुख दीपक चव्हाण, सहायक कार्यशाळा अधीक्षक पांडुरंग गुढेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर बसस्थानकातील महिला प्रवाशांच्यावतीने केक कापण्यात आला. प्रवाशांनी एसटी कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी लेखाकार कस्तुरी सुर्वे, वाहतूक निरीक्षक वंदना कोजरोळकर, अमोल मोहिते, सुशांत मोहिते, प्रवीण कदम, अमोल घाणेकर, अंकुश घाडगे, अस्मित पाथरे, ए. आर. पवार, पराग बागवे, वाहन परीक्षक संजय रसाळ आदी उपस्थित होते.