दिव्यातील लक्ष्मीबाई म्हात्रे यांना अखेर १८ वर्षांनी न्याय मिळाला….पहा सविस्तर

Spread the love

दिव्यात बांधकाम व्यावसायिक श्री.मनोहर बेडेकर यांच्याकडून आजीबाईची फसवणुक; अखेर १८ वर्षांनी आजीबाईंना न्याय मिळाला.


दिवा : दबाव वृत्त दिवा शहरातील बेडेकर नगर येथे राहणाऱ्या लक्ष्मीबाई म्हात्रे यांनी १८ वर्षा पूर्वी १लाख रूपये किंमती मध्ये मनोहर बेडेकर यांच्या कडून रूम खरेदी केला होता.त्यातील ८० हजार रुपये शशिकांत बेडेकर तर २० हजार बांधकाम व्यावसायिक मनोहर बेडेकर यांना दिल्याचे लक्ष्मीबाई म्हात्रे यांनी सांगितले. दोन्ही भावांच्या वादाने मनोहर बेडेकर याने रूम देण्याचे सांगितले होते.परंतु आज उद्या करत गेल्या अनेक वर्षांपासून मनोहर बेडेकर यांनी लक्ष्मीबाई म्हात्रे यांना गाळा राहण्यास दिला.आजी एकट्याच राहत असल्याने लहान मुलांचे बिस्कीट,चॉकलेट,वेफर्स,साबण विकून स्वतः चा उदार निर्वाह चालवत होत्या.६ महिन्या पूर्वी बांधकाम व्यावसायिक मनोहर बेडेकर याने तो गाळा विकून आजींना रात्रीत चाळीतील रूम मध्ये राहण्यास पाठवले.काही दिवसातच आजींना प्यरालाईस झाला. सदर विषयी समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांना फोन करून सविस्तर माहिती दिली.काही दिवसा पूर्वी या बाबत फेसबुक पोस्ट करून आजींना न्याय देण्यात यावा पोलिस प्रशासनास देखील टिविटरच्या माध्यमातून मागणी करून आजींचा नंबर तसेच इतर अनेकांचा नंबर पाठवला होता.परंतु बांधकाम व्यावसायिक मनोहर बेडेकर यांच्या गुंड शाहीला घाबरून नागरिक समोर येत नाहीत.ही बाब देखील पोलिस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली.


मागील ३ महिन्या अगोदर लक्ष्मीबाई म्हात्रे यांना भेटण्यासाठी गेले असता बांधकाम व्यावसायिक मनोहर बेडेकर यांनी हुज्जत घालून “तू आमची बदनामी करू नको” माझ्यासारखा वाईट वाईट माणूस कोणी नाही.तू गप्प रहा आम्ही आजींना रूम देतो रूम नाही दिली तर नंतर बोल असे सांगितले होते.त्यावर तू रूम दे मला तुझ्याशी वैयक्तिक वाद नाही.पण तुला आजींना रूम द्यावा लागेल ३ महिने मी थांबतो.असे सांगून सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे परतीचा प्रवास केला . जवळपास 3 महिने झाल्याने गेल्या ४ दिवसा पासून लक्ष्मीबाई म्हात्रे समाजसेवक अमोल केंद्रे यांना कॉल करून मदत करण्यासाठी विनंती करत होत्या.रविवारी सकाळी आजींनी कॉल केल्या नंतर समाजसेवक अमोल केंद्रे यांनी पत्रकार संदीप जाधव तसेच दिनेश रावल यांना बेडेकर नगर येथील आजींना न्याय मिळवून द्यायचा आहे.त्यांना दिवा पोलिस चौकी येथे घेवून जायचे आहे.तुम्ही सोबत चला अशी विनंती करून त्यांना सोबत घेवून बेडेकर नगर येथिल मंदिर समोर गाडी उभी करत असता.पाठी मानून एका व्यक्तीने आवाज दिला केंद्रे साहेब आज इकडे कुठे त्यावर आजींना न्याय मिळाला नाही त्यांना पोलीस चौकी येथे घेवून जाणार आहे.असे सांगितल्यावर थांबा आपण इथेच प्रश्न मिटवू आजींना रूम देवू असे सांगून मनोहर बेडेकर यांना बोलावले.मनोहर बेडेकर याने हुज्जत घालत सामाजिक कार्यकर्ते श्री.अमोल केंद्रे यांच्या सोबत हुज्जत घालून पत्रकारांच्या वर हात उचलला. सदर प्रकरणा नंतर श्री.मनोहर बेडेकर तसेच श्री.शशिकांत बेडेकर यांचा मुलगा यांनी लक्ष्मीबाई म्हात्रे आजींचा रस्ता अडवून तू पोलिस चौकीत गेली तर तुला रूम देणार नाही.आम्ही तुला बघुन घेवू म्हणून धमकी दिली.तरी देखील आजींनी बेडेकर यांच्या गुंड गिरीला न घाबरता पोलिस ठाणे गाठले.

दिव्यात पत्रकारांला मारहाण झाल्याचा व्हिडिओ वायरल झाल्याने व्हॉईस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री.तुषार रसाळ,त्यांचे सहकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते दिवा पोलिस ठाणे येथे तात्काळ हजर झाल्याने सदर प्रकरणी पोलिसांनी मनोहर बेडेकर याच्या वरती भां.द.वी कलम ३२३ ,५०४ नुसार गुन्हा दाखल केला असून. बांधकाम व्यावसायिक श्री.मनोहर बेडेकर यांनी ताबडतोब आजींना रूम देण्याचे पो.नि.श्री.शहाजी शेळके यांनी सांगितल्याने.आजींना रूम १५ दिवसात देण्याचे सांगून सदर रूमचे पेपर आजींच्या नावे करून दिले. याबाबत आजींनी समाजसेवक अमोल धनराज केंद्रे तसेच पत्रकार संदीप जाधव,दिनेश रावल,शेळके साहेब तसेच त्यांच्या मदतीला धावून आलेल्या प्रत्येकाचे आभार मानले.१८ वर्षा नंतर आजींना हक्काचा रूम मिळणार असल्याने आजींना आनंदाचे अश्रू अनावर झाले होते.श्री.मनोहर बेडेकर यांनी बेडेकर नगर येथील अनेक नागरिकांना फसवले असल्याने ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे अश्या नागरिकांनी न घाबरता मुंब्रा पोलिस ठाणे अंतर्गत दिवा पोलिस ठाणे येथे तक्रार करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमोल केंद्रे यांनी केले आहे.

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page