
मुंबई- दिल्लीहून गोव्याला 191 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं मुंबईतील छत्रपती शिवाजी मराराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. बुधवारी रात्री 9.53 वाजता विमान सुरक्षितपणे मुंबई विमानतळावर उतरले. अहमदाबाद एअर इंडिया विमान दुर्घटनेवेळी वैमानिकांनी दिलेल्या ‘मेडे मेडे’ मेसेजची चर्चा होती. तर कालच्या इमर्जन्सी लँडिंगवेळी वैमानिकाने “पॅन पॅन पॅन” असा मेसेज दिला.
दिल्लीहून गोव्याला जाणाऱ्या इंडिगो 6E 6271 विमानामध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. प्रवाशांनी जीव मुठीत धरला. काही मोठं घडण्याआधी पायलटने विमानाचं इमर्जन्सी लॅण्डिंग मुंबई विमानतळावर केलं. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने इमर्जन्सी लॅण्डिंग करावं लागलं. या विमानात एकूण 191 प्रवासी आणि क्रू मेंबर होते. सुदैवानं पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. सगळे प्रवासी सुखरुप आणि सुरक्षित आहेत. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून हे विमान गोव्याच्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नियोजित वेळेनुसार रात्री 9:42 मिनिटांनी पोहोचणार होतं.

मात्र, विमानाच्या उड्डाणादरम्यान एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याचं लक्षात आलं. पायलटने रात्री 9:25 मिनिटांनी ‘पॅन-पॅन-पॅन’ कॉल दिला. हा एक प्रकारचा इमरजन्सी संदेश असतो. त्यानंतर विमान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर रात्री 9:52 वाजता सुरक्षितरित्या उतरवण्यात आलं. एअरबस A320 निओ सारख्या विमानांमध्ये दोन इंजिन्स असतात आणि हे विमान एका इंजिनवरही सुरक्षित उड्डाण आणि लँडिंग करू शकतं. याच तांत्रिक क्षमतेमुळे पायलटने प्रसंगावधान राखून योग्य निर्णय घेतला आणि मोठी दुर्घटना टळली. इंडिगो एअरलाइनने या घटनेची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, तांत्रिक बिघाडामुळे हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर