दिव्यातील ऑक्सफर्ड इंग्रजी माध्यमिक शिकणाऱ्या विद्यार्थिनीला कोरोना काळात मातृछाया हरपलेल्या विद्यार्थिनीला काकाने पैश्याआभावी शिक्षणासाठी मूळ गावी शाळेत टाकण्याचे ठरविले परंतु तिची मागील फी ४०,०००/- रुपये थकीत होती त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला मिळणे कठीण होते. म्हणून सदर पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेेनेचे विभाग अध्यक्ष श्री. कुशाल बजरंग पाटील यांच्याशी संपर्क साधला. शहर अध्यक्ष श्री. तुषार भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कुशाल पाटील यांनी तत्काळ ऑक्सफर्ड शाळेच्या मुख्याध्यापकांची भेट घेतली यावेळी त्यांच्या सोबत विभाग सचिव श्री. परेश भास्कर पाटील, उपविभाग अध्यक्ष श्री. ऋषिकेश श्रीराम भगत व मनविसे शाखाअध्यक्ष ज्ञानेश्वर आगवणे उपस्थित होते. मुख्याध्यापिकांनी त्वरित शाळेच्या व्यावस्थापकांशी चर्चा करून विद्यार्थिनीची पूर्ण थकीत फी माफ करून पालकांना त्वरित शाळा सोडल्याचा दाखला देऊ असे आश्वासन दिले व आज त्या विद्यार्थिनीच्या पालकांकडे शाळा सोडल्याचा दाखला सुपूर्द केला.
ऑक्सफर्ड शाळेने केलेल्या सहकार्याबद्दल शाळेच्या व्यवस्थापकांचे व मुख्याध्यापिकांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार; दिवा मनसे विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष कुशाल पाटील