अंधेरी : कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील साहेब यांची आज मुंबई मध्ये अंधेरी येथे सभा पार पाडली . लवकरच कुणबी सेना सभासद नोंदणी चालू होणार.कुणबी सेना युवा दल ची कार्यकारिणी देखील लवकरच जाहीर करणार. कुणबी समाजाच्या जातीच्या दाखल्याकरिता होणारा त्रास कसा कमी होईल त्यासाठी प्रयत्न करणार.मुंबई मधील कुणबी बहुसंख्य विभागात कुणबी सेना उमेदवार उभे करणार्.रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा देखील कुणबी सेना पूर्ण ताकदिनीशी लढवणार.मुंबईतील प्रत्येक वॉर्ड मध्ये कुणबी सेना शाखाप्रमुख यांची नियुक्ती करून मुंबईतील प्रत्येक वार्ड मध्ये कुणबी सेना आपले अस्तित्व निर्माण करणार. आपल्या कुणबी समाजाच्या राजकीय अस्तित्वासाठी मुंबई ते गावपर्यंत आणि अखंड महाराष्ट्र कुणबीमय करू
कुणबी सेना मुंबई अध्यक्ष श्री प्रकाश बारे ,कुणबी सेना सचिव श्री चंद्रकांत कुळये,मुंबई कोकण संपर्क प्रमुख श्री संदीप आंबेकर,मुंबई प्रवक्ते श्री रमेश गावडे,कुणबी महिला रणरागिनी भाविका डोंगरे,विले पार्ले विभागप्रमुख श्री चंद्रकांत म्हाद्ये,सांताक्रुज विभागप्रमुख श्री महादेव गोताड, वडाळा संघटक श्री दत्ताराम बंडबे,कांदिवली संघटक चंद्रकांत चौघुले आणि कुणबी समाज बांधव आणि कुणबी महिला भगिनी उपस्थित होत्या.कुणबी युवा शक्ती चे अध्यक्ष श्री सुरेश गावडे यांनी आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक सभा लावू तिथे आपण यावे असा आग्रह केला आहे ,काही महिन्यातच कोकणातील ही सभा असेल व त्याची अधिकृत माहिती देखील लवकरच. कुणबी समाजासाठी काम करणाऱ्यां समाज बांधव आणि भगिनी नी सामाजिक बांधिलकी सोबत सर्वच क्षेत्रात् काम करण्यासाठी सर्वांनी आग्रही असावे.काही महिन्यावर येणारी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक देखील ताकदीने लढवणार.
जाहिरात