
*श्रीकृष्ण खातू संगमेश्वर-* कुंभारखाणी बु तालुका संगमेश्वर येथे वडाची फांदी नतोडता वटपौर्णिमा मोठया उत्साहात संपन्न झाली. यावेळी सत्यवान सावित्री सह आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणात जेष्ठ मंडळी उपस्थित होती. छोटयानीही संस्काराचा भाग म्हणून कार्यक्रमात सहभाग घेतला.
विविध रगाच्या साड्या, पारंपारीक पेहरावं घालून महिला भगिनींनी वटवृक्षाची फांदी नतोडता गावाच्या मध्यवर्ती ग्रामपंचायत शेजारी असलेल्या सुमारे तीनशे वर्ष्याच्या वटवृक्षाचे पूजन, सूत्रवेष्टन केले तदंनंतर तयार रोपांचे पूजन व रोपण करून वटसावित्री सण पर्यावरण पूरक,उत्साहात व भक्तीभावाने साजरा केला. श्री विकास सुर्वे यांनी वड, पिंपळ,उंबर आदी प्रादेशिक वृक्षानबाबत शास्त्रीय व धार्मिक महत्व उपस्थित समुदायांस करून प्रबोधन केले. सिडबॉल चित्रपट निर्माते ज्योती बेडेकर आणि आखिल देसाई यांनी ग्रामीण भागातील सिडबॉल व पर्यावरणाबाबत एवढे सहकार्य मिळाल्याबाबत कृतज्ञता व्यक्त केली.

यापूर्वी पर्यावरण पूरक आखिल देसाई आणि ज्योती बेडेकर निर्मित सिडबॉल चित्रपटाचे चित्रीकरण कुंभारखाणी बु गावात झाले होते त्याचाच श्रीगणेशा म्हणून वडाच्या झाडांचे वितरण निर्मात्यांमार्फत करण्यात आले. सोबत चिंच, आवळा, गुलमोहर यांच्या बियाही वाटप करण्यात आल्या. प्रत्येकाने आपापल्या घरी कुंडीत रोपे तयार करून त्यांची जोपासना करण्याचा निर्धार कार्यक्रमात बोलून दाखवला.
कुंभारखाणी बु गावातील पर्यावरणाबाबत जागृत असलेल्या प्रत्येक वाडीतील लोकांनी, महिलानी घेतलेला सहभाग, महिलांना जा ये करण्यासाठी प्रत्येक गाडी धारकानी दाखवलेली तत्परता, गावात शहरांतून आलेले चाकरमानी उभंयते कुटुंबासह वटपौर्णिमा उत्सवाला हजर होते हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
सिडबॉल चित्रपट, ग्रामपंचायत कुंभारखाणी बु, माध्यमिक शाळा, गावातील वाड्या, ग्राममंदिरे, यांच्या सहकार्याने संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे पुन्हा पुन्हा प्रतीवर्षी आयोजन करावे अशी मागणी महिला वर्गातून करण्यात आली. काही दिवसांपूर्वी गडनंदीतून बुडाणाऱ्या मुलांना वाचवणाऱ्या येगाव गावाचा नाचरे आणि कुंभारखाणीचा सुशांत साळवी यांच्या धाडसाचे तसेच राज्यपातळीवर पॉवर लिफ्टिंग मद्धे द्वितीय क्रमांकाचे मानांकण मिळवणाऱ्या तन्वी संदीप सुर्वे हिचे टाळ्या वाजवून कौतुक, अभिनंदन करण्यात आले.
प्रत्येक उपस्थिताना एक एक वडाचे झाड देऊन रोपण व संगोपन करण्याची जबाबदारी देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.