
संगमेश्वर- संगमेश्वर कोंडसुर्डे येथील ज्येष्ठ नागरिक श्री प्रमोद शंकर पोवळे यांची नात कुमारी ज्ञानसी प्रशांत पोवळे हिला ब्रेन डेव्हलपमेंट एक्झामिनेशन (BDS) या परीक्षेत १०० पैकी ९१ गुण मिळाले. तिने चंद्रनारायण बलदवा इंग्लिश मीडियम स्कूल,जयसिंगपूर येथे प्रथम क्रमांक प्राप्त करून सुवर्ण पदक मिळवले आहे. तिने भारतात ७० वा क्रमांक पटकावला आहे. तसेच ज्ञानसीने श्री समृद्धी प्रज्ञा शोध परीक्षेमध्ये १०० पैकी ८६ गुण प्राप्त केले आहेत. या परीक्षेत सुद्धा तिने शाळेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. याबद्दल या कोकण कन्येचे कौतुक करण्यासाठी कोंडअसुर्डे ग्रामपंचायत चे कर्मचारी श्री महेश मुरकर ,श्री विनायक संसारे (एस.टी कर्मचारी,चिपळूण डेपो) , समाजसेवक व कायदासाथी श्री दिनेश अंब्रे व इतर नातेवाईक यांच्या हस्ते तिचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.
यावेळी तिचे पालक श्री व सौ. प्राजक्ता प्रशांत पोवळे, श्री व सौ. प्रगती चंद्रकांत कारेकर व ज्येष्ठ नागरिक श्री प्रमोद शंकर पोवळे हे उपस्थित होते. ज्ञानसी हिला सौ. एस.व्ही पाटील व श्री राघव पुजारी यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.
