मुंबई (शांताराम गुडेकर )
कोणतेही धेय्य साध्य करण्यासाठी केवळ महत्त्वाकांक्षा असून ते साध्य होत नाही.त्यासाठी जिद्द, चिकाटी आणि अविरत मेहनत महत्त्वाची असते.श्री.रोहिदास नारायण दुसार साहेब (सेवा निवृत्ती अप्पर पोलीस अधीक्षक तथा उप प्राचार्य पोलिस प्रशिक्षण केंद्र खंडाळा)यांनी १९९५ पासून जो ध्यास घेतला होता तो आता प्रत्यक्षात आला आहे.इंग्रज भारतात आल्यापासून त्यांनी पोलिस प्रशिक्षण आणि प्रशासन याबाबत केलेले नियम, कायदे व वेळोवेळी बदल केले त्याबाबतची माहिती संकलित करून दुसार यांनी अनेक पुस्तके प्रकाशित केली.दक्षता मासिकात अनेक संशोधनात्मक लेख लिहिले.त्याच आधारे आता पोलिस प्रशिक्षण या संशोधक विषयावर त्यांच्या प्रबांधकास पीएच.डी. प्रधान करण्यात आली आहे.सलग २७ वर्ष त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या पुराभिलेख संचालनालय मुंबई कार्यालयात शेकडो अभिलेख खंडातून माहीतीचा शोध घेतला. आज के. श्री.मधुकर बाईंग यांची प्रामुख्याने आठवण येते.कारण मुंबई विद्यापीठ प्रबंध विभागात ते कार्यरत होते आणि त्यांनी प्रबंध नोंदणी व आवश्यक ते सहकार्य करून फार सहकार्य केले होते.
रोहा तालुक्यांतील गोपाळवट गावचे रहिवासी असलेल्या श्री. रोहिदास नारायण दुसार सरांचा जीवनपट संघर्षमय आहे.परिस्थितीला दोष न देता त्यांनी आव्हान स्वीकारून काम केले. वसतिगृहात प्रवेश घेऊन शिक्षण घेतले. सन १९७१ साली रोजगार हमी योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळेत दरमहा शंभर रुपये पगारावर त्यांनी शिक्षक म्हणून नेमणूक स्वीकारतील. बी.ए., एमए., बी. एड. या पदव्या नोकरी करीत असतानाच मिळविल्या. बी. एड. होण्यासाठी ते विणावेतन रजा घेऊन १९८१ साली मुंबईत आले. मुंबईतील कुणबी विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेतला.त्यावेळी आमचा परिचय झाला तो आजतागायत कायम आहे.
स्पर्धात्मक एमपीएससी उत्तीर्ण होऊन दुसार सरांची पहिली पोलिस सब इन्स्पेक्टर म्हणून नेमणूक रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्टेशन येथे १९८३ साली झाली.पुढे अनेक ठिकाणी बदली होत राहिली. परंतु पोलिस गुप्तहेर खात्यात त्यांनी बरीच वर्षे सेवा केली.त्याच काळात त्यांनी अनेक लोकोपयोगी सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये काम करण्यास सुरावात केली. समाज सुधारकांची चरित्र वाचन हा त्यांचा आवडता विषय आहे. कोकण गांधी पू. आप्पासाहेब पटवर्धन, शिक्षण क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केलेले पू. सामंत गुरुजी यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून त्यांच्या जीवनावर आधारीत पुस्तके प्रकाशित केली. त्यांनी एकूण १६ पुस्तके प्रकाशित केली आहेत.आर्थिक लाभाची अपेक्षा न करता अध्यापही चार पुस्तकांचा संच प्रकाशनाच्या वाटेवर आहे. कोकणातील कुणबी समाजाच्या वाटचालीत मोठे योगदान दिलेल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांची माहिती संकलित करण्यासाठी ते सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
मुंबईतील कुणबी विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश घेतलेल्या १९७२ पासून सर्व माजी विद्यार्थांना संघटीत करून "कुणबी वसतिगृह आजी माजी विद्यार्थी परिषदेचे २०१७ पासून दुसार सर अध्यक्ष आहेत. कुणबी सहकारी बँक सल्लागार समिती सदस्य म्हणून त्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. याशिवाय कुणबी विवाह सलागार मंडळ सदस्य म्हणून ते दर सोमवार आणि गुरुवारी गेली दहा वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
सन्मा.रोहिदास नारायण दुसार सर यांनी आपले धेय्य साध्य करण्यासाठी काही महिने वीना वेतन रजा घेऊन काम केले.सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत केवळ एक कप चहा घेऊन जुने व दुर्मिळ अभिलेख मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असायची.शेवटी आता तो दिवस उजाडला आणि आमचे चाळीस वर्षे मिञ असलेले श्री.रोहिदास नारायण दुसार आता डॉ.रोहिदास नारायण दुसार म्हणून संबोधले जाणार याचा आम्हा मित्र- परिवाराला फार आनंद होत आहे असे मत श्री.पी.डी.ठोंबरे(संचालक
कुणबी सहकारी बँक ली.मुंबई)यांनी अभिनंदन सह शुभेच्छा देताना व्यक्त केले.