
कारवाई करा नाहीतर जश्यास तसे उत्तर : कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघ
ठाणे ( प्रतिनिधी) ३ एप्रिल २०२३ रोजी डाऊन दिशेकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेस मधील परप्रांतीय फेरिवाल्यांनी नेत्रवती एक्सप्रेस मधील भूमिपुत्र मराठी फेरीवाले आपले रोजंदारीकरिता कार्य करीत असताना रेल्वेत गाडींत रसोई कोच (पेन्ट्रि कार) मधील परप्रांतीय फेरीवाल्यांनी भूमिपुत्र फेरीवाल्यांना मोठ्या प्रमाणात हल्ला (प्राण घातक) केला.याप्रकरणी चिपळूण येथे रीतसर गुन्हा नोंद करूनही अजूनही काही हल्लेखोरांवर कारवाई झालेली नाही.त्यामुळे झालेल्या हल्याप्रकरणी कोकण रेल्वे प्रवाशी सेवा संघाने मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे
२६ जानेवारी १९९८ रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या कोकण रेल्वेचे जनक प्राध्यापक मधू दंडवते साहेब यांच्या अपरिचित वैचारिक बौद्धिक क्षमतेवर स्वप्नपूर्ती झालेल्या रोहा मंगलोर (उडीपी) स्थानक दरम्यान कोकण रेल्वे सुरू करण्यात आली. सध्या मुंबई छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनल्स (मध्य रेल्वे) ते कोकण पट्ट्यातून कोकण मार्गे रोहा ते मेंगलोर असा कोकण रेल्वे मार्ग अखंड भारतात, भारतीय रेल्वेला सर्वात फायदेशीर आणि मोठ्या प्रमाणात नफा (व्यवहारिक) देणारा रेल्वे मार्ग आहे.
सुमारे ७४१ किलोमीटर अंतरावर विखुरलेला कोकण रेल्वे मार्ग कोकणातील मुंबई, ठाणे, पनवेल, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हांतर्गत येत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील या जिल्ह्यातील कोकणवासियांच्या जमिनीतून रेल्वे मार्ग काढला आहे. त्यातच भूमिपुत्रांच्या शेतजमीन, जमिनी, घरे आदींची कोकण रेल्वे मार्ग उपभोग घेत आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही सौम्य प्रमाणात भूमिपुत्रांना कोकण रेल्वेने रोजगारीची संधी उपलब्ध करून दिली. तरीही बऱ्याच मोठ्या प्रमाणात भूमिपुत्र (पदवीधर/सुशिक्षित) कोकण रेल्वे रोजगार, नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यातच भारतीय रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर परप्रांतीयांची वर्णी मोठ्या प्रमाणात लावली आहे. मग भूमिपुत्रांना त्यांच्या जमिनीवरून गेलेल्या कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेत अथवा इतर काही उपजीविका साधनांत रोजगार उपलब्ध का होत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
दरम्यान सबंधित हल्लेखोरांवर कारवाई न झाल्यास
महाराष्ट्रातील कोकणवासीय, कोकण रेल्वे प्रवासी संघटना गप्प बसणार नाही. त्यांना आमच्या भाषेतच उत्तर देऊ असे कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाकडून निवेदनाद्वारे सांगितले आहे.