दिवा : प्रतिनिधी मुंब्रादेवी कॉलनी मधील रहिवाशांना दिवा स्टेशन ते विठ्ठल मंदिर पर्यंत रिक्षाने प्रवास करताना सध्या १५ रुपयांचे भाडे आकारले जाते. मार्च २०२० मध्ये लॉकडाउन पूर्वी विठ्ठल मंदिरापर्यंतचे भाडे हे १० रुपये आकारले जात होते. पण लॉकडाउन मध्ये प्रशासनाने रिक्षा प्रवास करताना प्रवाशांची वाहतूक करण्याचे संख्येवर निर्बंध आणले होते. त्यामुळे बहुतेक ठिकाणी भाड्याचे गणित सांभाळण्यासाठी रिक्षा प्रवासाचे भाडे हे १० रुपायांवरून १५ रुपये करण्यात आले. पण प्रशासनाने घालेलले निर्बंध कमी झाल्यानंतरही प्रवासी भाडे मात्र तितकेच आकारले जात आहे.
विशेषतः सारखेच अंतर असणाऱ्या दिवा स्टेशन ते ग्लोबल हायस्कूल पर्यंतचे रिक्षाचे भाडे हे १० रुपयेच आकारले जाते. ही बाब कोकण प्रतिष्ठान च्या शिष्टमंडळाने युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. वरील वस्तुस्थिती लक्षात घेऊन विठ्ठल मंदिरापर्यंतचे भाडे पुन्हा १५ रुपायांवरून १० रुपये करण्यात यावे अशी मागणी कोकण प्रतिष्ठान कडून निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी किमान दिवा स्टेशन ते ग्लोबल हायस्कुल आणि दिवा स्टेशन ते विठ्ठल मंदिरापर्यंतचे भाडे एकसारखेच ठेवण्याबाबत नक्कीच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी कोकण प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात