नवी मुंबई, दि.२७ :- कोंकण विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी दिनांक २६ जून, २०२४ रोजी कोकण विभागातील पाचही जिल्ह्यांच्या प्राप्त आकडेवारीनुसार एकूण ६४.१४ टक्के मतदान झाले. मतदार यादीनुसार कोकण विभागामध्ये १ लाख २७ हजार ७६९ पुरुष, ९५ हजार ६३९ स्त्री मतदार असे एकूण २ लाख २३ हजार ४०८ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी ८४ हजार ६६५ पुरुष,५८ हजार ६३२ स्त्री असे एकूण १ लाख ४३ हजार २९७ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुंबई पदवीधर मतदारसंघात मतदार यादीनुसार ७१ हजार १० पुरुष तर ४९ हजार ७६१ स्त्री मतदार असे एकूण 1 लाख 20 हजार ७७१ पदवीधर मतदार आहेत. त्यापैकी 41 हजार 44 पुरुष तर २६ हजार ६०२ स्त्री असे एकूण 67 हजार ६४६ पदवीधर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघात मतदार यादीनुसार ३ हजार ९५३ पुरुष तर ११ हजार ८८६ स्त्री मतदार असे एकूण १५ हजार ८३९ शिक्षक मतदार आहेत. त्यापैकी ३ हजार १३० पुरुष तर ८ हजार ८७२ स्त्री असे एकूण १२ हजार ०२ शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दिनांक 26 जून जानेवारी 2024 मतदान वेळ :- सकाळी 07.00 ते सायंकाळी 06.00 पर्यंतच्या मतदानाची टक्केवारी
🔹️कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ ६४.१४%
▪️ठाणे- ५८.४२%,
▪️पालघर- ६३.२३%,
▪️रायगड- ६७.५९%,
▪️रत्नागिरी-६९.१४%,
▪️सिंधुदूर्ग-७९.८४%
▪️एकूण- ६४.१४%
🔹️मुंबई पदवीधर मतदारसंघ ५६.०१%
▪️मुंबइ शहर- ५७.६८%,
▪️मुंबई उपनगर-५५.४४%
▪️एकूण-५६.०१%
🔹️मुंबई शिक्षक मतदारसंघ ७५.७७%
▪️मुंबइ शहर- ८०.१२%,
▪️ मुंबई ▪️उपनगर-७४.९५%
▪️एकूण-७५.७७%
मत मोजणी सोमवार दि. 1 जुलै 2024 रोजी आगरी कोळी संस्कृती भवन, सेक्टर-24, नेरुळ (पश्चिम), नवीमुंबई येथे होणार आहे.