रत्नागिरी: कोकणातील तीन जिल्ह्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. रेवस ते रेड्डी या सागरी मार्गाचा आराखडा तयार झाला आहे. त्याला राज्य सरकारची मंजुरी देखील मिळाली आहे. या मार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.
निसर्गाने कोकणाला भरभरून दिले आहे. कोकणात सात जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यापैकी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील समुद्रकिनारे, प्रेक्षणीय स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. आता कोकणातील याच तीन जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. कारण सागरी महामार्गाची सुरुवात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असा असल्याने तेथील विकासाला चालना मिळणार आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालाच समांतर असलेल्या आणि अनेक वर्षापासून रखडलेला रेवस ते रेडी या सागरी महामार्गासाठी ही राज्य सरकारने 9 हजार 573 कोटींची तरतूद करत कोकणच्या पर्यटन विकासाची तुतारी फुंकली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन शहरे नव्याने विकसित करण्याचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण पाहता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणानंतर त्याला समांतर असलेल्या आणि कोकण पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारा 540 किलोमीटर लांबीचा सागरी महामार्ग रेवस ते दीघी-जैतापूर-वेंगुर्ला-रेड्डी असा जाणार हा महामार्ग अनेक वर्षापासून प्रस्तावित आहे. रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग अद्यापही अविकसित आहे. तीन जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अरबी समुद्राच्या किनाऱ्याने जातो.
विविध धार्मिक स्थळे, पर्यटन क्षेत्रे, समुद्रकिनारे, बंदरे, मासळी मार्केट, विमानतळ आधी या महामार्गावर आहेत त्यामुळे हा महामार्ग रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी वरदान ठरणार आहे. 540 किलोमीटरचा हा मार्ग दुपदरी असणार आहे.सागरी महामार्ग रायगड जिल्ह्यातून जात असल्याने या महामार्गामुळे जिल्ह्यातील अलिबाग, पेड, उरण, रोहा मुरुड, तळा, मासळा, श्रीवर्धन या प्रमुख शहरांच्या विकासासाठी विकासाच्या कक्षा रुंदावणार आहेत. त्याचबरोबर मांडवा, सासवणे, किहीम, वर्सोली, अलिबाग, आक्षी, नागाव, रेवदंडा,कोलई नांदगाव, मुरुड, दिघी, दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या पर्यटन स्थळांना सागरी पर्यटनाचे महत्त्व वाढणार आहे.
रत्नागिरीतील मंडणगड,दापोली, गुहागर, रत्नागिरी ही प्रमुख शहरे आणि गणेशपुळे, पावस, नाणीज, आंबडवे या पर्यटन स्थळी अधिक विकास होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण, देवगड, वेंगुर्ला या शहरांमध्ये विकासाचा मार्ग मोकळा होईल.
कोकणातील तीन जिल्ह्यात या महामार्गाने आर्थिक समृद्धी येणार आहे.रेवस, अलिबाग, मुरुड, दिघी, हरिहरेश्वर भांडखोर, दापोली, गुहागर, जयगड, गणपतीपुळे, जैतापूर, रत्नागिरी, देवगड, मालवण आणि वेंगुर्ला या प्रमुख पर्यटन स्थळांना जोडणारा हा मार्ग असणार आहे. या मार्गावर 44 खाडी पूल 21 मोठे पूल आणि 22 लहान मुलांचा समावेश आहे.
रायगडमध्ये मुरुड, नांदगाव, आदगाव, धारावी रत्नागिरीतील वेसावी, बानकोट, वेळास, पालशेत, शिरगाव, मालगुंड कळेशी या गावांपलीकडून रस्ता काढण्यात येणार आहे. अशीच परिस्थिती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर,कातवड मीठ बाब, वेळुस ,वेळ टाक व म्हापन या गावात आहे.रस्त्याची देखभाल करण्याकरता स्वतंत्र निधी उपलब्ध करण्याची मागणी स्थानिक पातळीवरून केली जात आहे.
जाहिरात :