
भारतात बनावट नोटा जवळ ठेवणे म्हणजे कायदेशीर गुन्हा आहे. जर तुम्हालाही कुठे बनावट नोट सापडली तर ती तात्काळ उशीर न करता पोलीसांकडे जावे आणि ती नोट त्यांच्याकडे सुपूर्द करावी. म्हणून तुमच्याकडे असलेली ठराविक रक्कमेची नोट बनावट नाही ना याची खात्री करुन घेऊ शकता.
बनावट नोटा कशा ओळखणार?
1) नंबर तपासा : प्रत्येक भारतीय नोटेवर अनुक्रमांक छापलेला असतो. नोटेच्या दोन्ही बाजूंना हा एकच नंबर पाहायला मिळतो. बाजूच्या पॅनलवर छापलेल्या क्रमांकाशी हा नंबर जुळत असतो.
2) वॉटरमार्क तपासा: भारतीय चलनी नोटांवर महात्मा गांधी यांच्या फोटोचा वॉटरमार्क असतो, यावर प्रकाश पडल्यावर तो दिसू लागते. हा वॉटरमार्क नोटेच्या डाव्या बाजूला असतो.
3) मुद्रण गुणवत्ता तपासा: खऱ्या भारतीय नोटा उच्च प्रतीच्या छपाई तंत्रामार्फत छापल्या जातात. यामध्ये काही तीक्ष्ण रेषा देखील पाहायला मिळतात. या दोन्ही गोष्टी नसलेल्या नोटा या बनावट आहेत असे समजले जाते.
4) सुरक्षा धागा तपासा: आपल्या देशातील नोटांवर एक विशिष्ट सुरक्षा धागा असतो, यावर RBI असे लिहिलेले आहे. शिवाय नोटेचे मूल्यदेखील छापलेले आहे.
5) नोटेवरील सूक्ष्म अक्षरे तपासा: भारताच्या चलनी नोटांमध्ये काही ठराविक सूक्ष्म अक्षरे पाहायला मिळतात. भिंगाच्या मदतीने ही अक्षरे ओळखता येतात. याची रचना तीक्ष्ण आणि अचूक स्वरुपात असतात. ही अक्षरे पूर्णपणे स्पष्ट असतात. नोटेवर ही अक्षरे अस्पष्ट स्वरुपात असल्यास ती नोट बनावट आहे असा तर्क लावला जातो.