
आज कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन चांगलं राहील, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य (Horoscope) कसं असेल?, जाणून घ्या ज्योतिषी आचार्य सरिता शर्मा यांच्या आजच्या राशीभविष्यात.
*मेष (ARIES) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात असेल. आज आपण कुटुंबीयांसह घरगुती बाबींचा महत्वपूर्ण विचार – विनिमय कराल. घराचा कायापलट करण्याच्या नवीन योजना आखाल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह महत्वपूर्ण मुद्दयांवर विचार कराल. कार्यालयीन कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आईकडून लाभ संभवतो. आपल्या एखाद्या कामास किंवा प्रकल्पास सरकारी मदत मिळेल. कामाचा व्याप वाढल्यानं अस्वस्थ राहाल.
*वृषभ (TAURUS) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात असेल. आज विदेशात राहणारे नातलग किंवा मित्र यांच्याकडून सुखद बातमी मिळाल्यानं मनाला प्रसन्नता लाभेल. परदेशी जाण्याची इच्छा असणार्या लोकांना आजचा दिवस अनुकूल आहे. दूरचे प्रवास करण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. व्यापार – व्यवसायात लाभ होईल. स्वास्थ्य साधारण राहील.
*मिथुन (GEMINI) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता आहे. एखादी शस्त्रक्रिया करावी लागेल. रागामुळं स्वतःचीच हानी होण्याची शक्यता असल्यानं डोकं शांत ठेवा. मानहानी संभवते. आज आपण मनाने अस्वस्थ असाल. बोलण्यावर ताबा ठेवून वादविवाद टाळणे हेच आपल्या हिताचं आहे. अतिरिक्त खर्चामुळं आर्थिक चणचण जाणवेल. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.
*कर्क (CANCER) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात असेल. समृद्ध जीवनशैली व मनोरंजक वृत्तीमुळं आज आपण आनंदी राहाल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. मान-प्रतिष्ठा वाढेल. एखाद्या प्रवासाचा बेत आखू शकाल.
*सिंह (LEO) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात असेल. आज आपलं मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्यांचं सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. केलेल्या कष्टाचे श्रेय न मिळल्यानं मन उदास होईल.
*कन्या (VIRGO) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात असेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल आहे. संततीविषयी चिंता लागून राहील. सट्टा-शेअर बाजारात सावध राहून व्यवहार करावेत. मन दु:खी असेल. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत भाग घेऊ नये.
*तूळ (LIBRA) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. मनात हळवेपणा जास्त प्रमाणात राहील. शारीरिक उत्साहाचा अभाव जाणवेल. मानसिक तणाव सुद्धा असेल. धनाची तसेच कीर्तीची हानी होईल. आईच्या प्रकृतीची काळजी राहील. जवळच्या नातलगांशी संघर्ष किंवा वाद झाल्यानं मनाला यातना होतील.
*वृश्चिक (SCORPIO) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रांबरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल. मन प्रसन्न राहील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त कराल.
*धनू (SAGITTARIUS) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. काही गैरसमजामुळं निर्णयाप्रत जाणं अवघड होईल. मन दुःखी राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. कामात अपेक्षित यश न मिळाल्यानं मन निराश होईल. कामाचा व्याप वाढेल. अकारण खर्च वाढतील.
*मकर (CAPRICORN) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील. आपल्या कामगिरीवर वरिष्ठ खूष होतील. कामे सहजपणे पार पडतील. अनुकूल परिस्थितीचा आपण फायदा करून घ्यावा. मन शांत राहील. शारीरिक कष्ट होतील.
*कुंभ (AQUARIUS) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात असेल. आज मन आणि शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण-घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावं. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावं लागेल. खर्च वाढेल. स्वतः तोटा सोसूनही कोणाचे तरी भले कराल. बोलणं आणि रागावर संयम ठेवावा लागेल. एखादा अपघात संभवतो.
*मीन (PISCES) :* चंद्र आज मकर राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात असेल. आज अचानक धनलाभ संभवतो. संततीकडून चांगली बातमी मिळेल. बालपणीचे किंवा जुने मित्र भेटल्याने आनंदीत व्हाल. नवीन मित्रांशी सुद्धा संपर्क होईल व त्याचा भविष्यात फायदा होईल. सामाजिक प्रसंगात भाग घेण्यासाठी बाहेर जावे लागेल. व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. एखाद्या रमणीय स्थळाला भेट द्याल.