जनशक्तीचा दबाव न्यूज | गुहागर | मार्च ०२, २०२३.
गुहागर तालुक्यातील गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या श्री. संतोष जैतापकर यांच्या वैद्यकीय चमूचे गुहागर तालुक्यात्त अत्यंत उल्लेखनीय योगदान आहे. तालुक्यातील रुग्णांनाच तर कित्येक वेळेस विविध दवाखान्यांना सहकार्य करण्याचे काम या टीमच्या सर्व सदस्यांनी केले आहे.
कोरोनाच्या विपरीत कालखंडात या टीमने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कार्य केले होते. या टीमच्या माध्यमातून अनेक व्यक्ती रुग्णसेवा करत आहेत. यामध्ये प्रमुख शिलेदार आहेत गुहागरमधील पाभरे गावचे सुपूत्र श्री. काशीराम पास्टे. कोणत्याही क्षणी यांना फोन केला तरी खात्रीपूर्वक आपल्याला मदत मिळणार असा लोकांचा ठाम विश्वास आहे. त्यांच्यासोबतच युवा रुग्णसेवक मितेश घडशी यांचाही मायभूमी फाउंडेशनच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.
शिरोडकर हायस्कूल, परेल मायभूमी फाउंडेशनने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी शिबिराच्या उद्घाटनानंतर या दोघांचा सत्कार संपन्न झाला. अनेक मोठ्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यामुळे गुहागरमध्ये सर्वत्र सत्कारप्राप्त रुग्णसेवकांचे अभिनंदन होत आहे.