ज्यांना जनाधार नाही त्यानी उगाचच वाटेल त्या बातम्या सोशल मीडियावर पाठवून जनतेच्या मनात सभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, सर जो निर्णय घेतील तो सर्व कार्यकर्त्याना मान्य असेल – मज्जीद नेवरेकर, राष्ट्रवादी जिल्हा कार्यकारणी सदस्य..
संगमेश्वर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते आमदार शेखर निकम यांच्या पाठीशी ठाम, तालुक्याचा सर्वागीन विकासासाठी जो निर्णय सर घेतील तो आम्हला मान्य – राजेंद्रकुमार पोमेंडकर, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस संगमेश्वर
“सर सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण आम्हाला मान्य” :- मुरादभाई आंबेडकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व रुपेश उर्फ बाळा शेट्ये मा. पंचायत समिती सदस्य यांचे रोखठोक मत….*
✍️ श्रीराम शिंदे / संगमेश्वर :-
सध्याची राजकीय परिस्थिती पाहता चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदार संघांचे संवेदनशील लोकप्रिय आमदार शेखर निकम सर यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका संगमेश्वर तालुक्यातील कार्यकर्ते व सरांवर प्रेम करणाऱ्या तमाम हितचिंतकांनी घेतली आहे
सर आमदार होण्याच्या आधी पासूनच स्वर्गीय शिक्षणमहर्षी गोविंदरावजी निकम साहेब यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेमध्ये सामाजिक कामाचा वसा अखंड चालू ठेवला चिपळूण संगमेश्वर मतदार संघांत भरघोस मतांनी निवडून आल्यावर मतदार जनतेचे आपण काही तरी देणं लागतो या भूमिकेतून मतदार संघामध्ये कधीच नाही झालेली अशी विकासकामे या साठी कोट्यावधिचा निधी मतदार संघात आणून विकासकामाचा धडाका लावला त्याच बरोबर क्रीडा, शिक्षण, आरोग्य या मध्ये मोठया प्रमाणात काम सातत्याने चालू ठेवले राज्यामध्ये राजकीय उलथापालाथी सातत्याने चालू असताना देखील मतदार संघाच्या विकासासाठी भरीव निधी आणण्याचे काम चालू ठेवले कसबा सारख्या ऐतिहासिक असल्याला गावातून जाणारा मुख्य रस्ता कित्येक वर्ष खड्यात होता त्या रस्त्याला सर यांनी कोट्यावधीचा निधी आणून पूर्ण केला नदीचा गाळ काढणे असो तसेच विविध वाढीवस्तीत छोटया मोठया स्वरूपाचे काम सरांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात झाले तालुक्याचा आमदार कसा असावा याचे उत्तम उदाहरण अल्पावधितच सरांनी अंगी असलेल्या नम्रते बरोबर दूरदृष्टी ठेवून केलेल्या मतदार संघाचा सर्वागीन विकास उल्लेखनीय आहे.
त्यामुळे आताच्या राजकीय घडामोडीत सर जो निर्णय घेतील तो तालुक्याच्या सर्वागीन विकासाच्या दृष्टकोनातून घेतील असा ठाम विश्वास येथील कार्यकर्ते व हितचिंतक यांच्या मनात आहे त्यामुळे काही झाले तरी कसबा जिल्हापरिषद गट व तालुक्यातील कार्यकर्ते, हितचिंतक आमदार शेखर निकम सर यांच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची भूमिका घेतली आहे असा निर्धार मज्जीद नेवरेकर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यकारणी सदस्य, राजेंद्रकुमार पोमेंडकर राष्ट्रवादी तालुका सर चिटणीस,मुरादभाई आंबेडकर अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रुपेश उर्फ बाळा शेटे मा. पंचायत समिती सदस्य,खालिद काझी, अकबर काका दसुरकर,सदानंद करदोडे,राजू शिंदे, संदेश कापडी, श्रीधर रजपूत,आसिफ धामस्कर,गुलाम पारेख,नासिर खलफे,प्रवीण चव्हाण,संकेत गुरव, महेंद्र मनवे,भाई पेंढारी,नियाज कापडी, इब्राहिम काझी,राजू तांबे, संजय म्हापुस्कर,रवींद्र बाईत,निकेत चव्हाण,शौकत खलफे, महंमद काझी, तौफिक पगारकार, समीर काझी, फिरोज कापडी, सज्जाद मुकादम, इलीयज मापारी, मलिक शेखदारे तमाम कार्यकर्ते व हितचिंतक.