
संगमेश्वर प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक संचालनालय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.११/०९/२०२५ रोजी श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय कोसुंब या ठिकाणी १९ वर्ष वयोगट तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
सदर स्पर्धेमध्ये संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा संचलित, न्यू इंग्लिश हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कसबा-संगमेश्वर या विद्यालयातील १९ वर्षे वयोगट विद्यार्थी व विद्यार्थीनींचे संघ सहभागी झालेले होते.

सदर स्पर्धेत कसबा हायस्कूलच्या १९ वर्षे वयोगट मुलींच्या कबड्डी संघाने सदर स्पर्धेतील सर्व सामने जिंकून तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये अभूतपूर्व यश संपादन करून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी कसबा हायस्कूलचा १९वर्षे वयोगट मुलींचा संघ संगमेश्वर तालुक्याचे नेतृत्व करणार आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून कसबा हायस्कूलने विविध खेळांच्या स्पर्धांमध्ये तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरती दमदार कामगिरी करत आहेत.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर