
संगमेश्वर/दि २७ सप्टेंबर- न्यू इंग्लिश हायस्कूल व जुनिअर कॉलेज कसबा या विद्यालयांमध्ये शुक्रवार, दि. 26 सप्टेंबर, 2025 रोजी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी, कसबा संगमेश्वर या संस्थेचे संस्थापक पैगंबरवासी काकासाहेब मुल्लाजी यांची 74 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सदर कार्यक्रमात फेब्रुवारी/मार्च 2025 मध्ये एस.एस.सी. व एच. एस. सी. परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी आणि क्रीडा क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री. नियाज कापडी यांनी भूषविले.
सुरुवातीला विद्यालयातील गीत मंचच्या विद्यार्थिनींनी काकासाहेबांना अभिवादन करणारे गीत व स्वागत गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत विद्यालयाचे प्राचार्य श्री. एच. जी. शेख यांनी संस्थेचा गौरवशाली इतिहास, संस्थेची यशस्वी वाटचाल आणि शाळेचे विविध क्षेत्रातील नैपुण्य यावर प्रकाश टाकले. त्यानंतर मान्यवरांचे शाळेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी इंग्रजी व मराठी माध्यमातील विद्यार्थी व शिक्षकांनी आपल्या मनोगतात काकासाहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेच्या स्थापनेत दिलेले अनमोल योगदानवीषयी आपले विचार मांडले.
काकासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यालयांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा तीन गटांमध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धा मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू या भाषेमध्ये घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये मराठी व इंग्रजी माध्यमांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सदर कार्यक्रमात स्पर्धेचा निकाल जाहीर करून प्रत्येक गटातील गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
शैक्षणिक वर्ष 2024 -25 मधील इयत्ता दहावी व बारावी या बोर्डाच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांक मिळविणाऱ्या कसबा मराठी माध्यम व इंग्रजी माध्यम विद्यार्थ्यांना संगमेश्वर एज्युकेशन सोसायटी कसबा संगमेश्वर कडून आकर्षक चषक देऊन यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
प्रतिवर्षाप्रमाणे कसबा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती माननीय कॅप्टन अकबर साहेब काझी यांच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.
पैगंबरवासी श्रीमती सईदा निसार काझी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्री. निसार इसहाक काझी यांच्याकडून इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना चषक देऊन गौरवण्यात आले.
पैगंबरवासी शरीफा हुसेन तांबोळी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ विद्यालयाच्या माजी प्राचार्या सौ. लतिफा निसार मणेर यांच्याकडून इयत्ता दहावी व बारावीमध्ये सर्वाधिक गुणप्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना चषक देऊन गौरविण्यात आले.
तसेच कै. वैशाली विजय पानवलकर (सरदेसाई) स्मृतीप्रीत्यर्थ श्री. विजय नरहर पानवलकर यांच्याकडून इयत्ता दहावी मराठी व इंग्रजी माध्यम बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनींना चषक देऊन गौरवण्यात आले.
कै. रामचंद्र गणेश जोशी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ श्रीमती जयश्री रामचंद्र जोशी यांच्याकडून इयत्ता दहावी मराठी माध्यम बोर्डाच्या परीक्षेत गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
तसेच क्रीडा क्षेत्रामध्ये जिल्हा विभाग व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या शाळेतील क्रीडापटूंचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे माननीय उपाध्यक्ष श्री.नियाज कापडी, उपाध्यक्ष श्री. इब्राहिम काझी, खजिनदार श्री शिकुर गैबी, सदस्य श्री. मुराद काझी, निमंत्रित श्री. फैसल मोडक, मराठी माध्यम विद्यालयाचे प्राचार्य श्री एच. जी. शेख, पर्यवेक्षक श्री. एस.ए. पटेल, इंग्रजी माध्यम माध्यमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती ए.एम. जुवळे, प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका श्रीमती गुलशन बेग, दोन्ही मध्यम विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

