माझ्याकडे येणा-या प्रत्येकाचा मानसन्मान ठेवला जाईल, राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देऊ – आमदार शेखर निकम
तुम्हा सर्वांचा मानसन्मान ठेवला जाईल, असा विश्वास आ. शेखर निकम सर्व ग्रामस्थांना दिला. गावाच्या विकासासाठी तुम्ही आलात. त्या विकासासाठी आपण लागेल तेवढा निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. आज मार्लेश्वर पर्यटनासाठी,महिपत गडासाठी तसेच मुरादपुर मार्लेश्वर तिठा ते मारळ निनावे आंबा घाट या रस्त्यासाठी लागणारा निधी आपण अजित दादांच्या मार्फत तालुक्यात आणला आहे. यामुळे आपल्या भागात पर्यटक येतील व येथील माझ्या ग्रामस्थांना छोटे मोठे उद्योग करून रोजगार मिळेल. रस्ते पाखाडया होत राहतील. लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिले याला आपलं प्राधान्य राहील. तालुक्यात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी छोटे छोटे पाझर तलाव होणे महत्वाचे आहे. काही मंजूर झाले आहेत काही मंजूर होण्याच्या मार्गावर आहेत. आपण कधीही कोणत्याही प्रकारचं राजकारण केलं नाही किंवा सामाजिक विकासाचं भांडवल केलं नाही त्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या प्रतेकाला समान न्याय सर्वांना एक सारखी वागणूक दिली जाते आपल्यायेथे राजकारणा पेक्षा विकासाला प्राधान्य देण्यात येते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळेच आज हुमणे गुरुजीसारखे सामाजिक कार्यात काम करणारे अनेक कार्यकर्ते आज आपल्या पक्षात येत आहेत असे आ. निकम यांनी स्पष्ट केले.
उपस्थित सर्व ग्रामस्थ आमदार निकम यांच्यावर कमालीचे खुष होते.त्यांचा जनतेशी असलेला संवाद, ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेऊन व गरज लक्षात घेऊन तातडीने सोडवण्याची पद्धत या सर्व गोष्ठी आदर्शवत आहेत.
त्यामुळे आमदार शेखर निकम यांच्या कार्य पद्धतीवर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी (अजित पवार )मध्ये आम्ही प्रवेश करत आहोत असे उपस्थित लोकांनी सांगितले.
यावेळी प्रवेश करणारे ग्रामस्थ:-
सुनील बुधाजी तोरस्कार, सुजाता शांताराम करंबेळे, प्रियांका तोरस्कर, सरिता करंबेळे, अनिता भोसले, सुलोचना अहीम, रेश्मा करंबेळे, सुनीता करंबेळे, प्रमिका तोरस्कार, सिद्धी करंबेळे, दर्शना करंबेळे,अयोध्या कुटे, दीक्षिता करंबेळे, वैशाली करंबेळे, रिया करंबेळे, सुलोचना करंबेळे, शुभांगी करंबेळे, सखाराम तानू घोलम,जयराम अनिर, शांताराम तोररस्कर, तुकाराम आलीम, रामचंद्र कदम, बाळू करंबेळे, कृष्णा करंबेळे, आत्माराम गुरव, नरेश करंबेळे, गणपत करंबेळे, सुवर्णा करंबेळे, संगीता गुरव, रंजना भोसले, शोभा करंबेळे, वनिता भोसले, चंद्रभागा करंबेळे, प्रशांत करंबेळे, स्वाती पेंढारी, वैशाली भोसले, सुलभा करंबेळे, रोहिणी भोसले, आदी ग्रामस्थांनी प्रवेश झाला.
यावेळी उपस्थिती कार्यकर्ते महिला प्रदेश उपाध्यक्ष सौ. पूजा निकम, सई निकम,तालुका अध्यक्ष राजेंद्र पोमेंडकर,देवरुख शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर, महिला तालुका अध्यक्ष मानसी करंबेळे, मुख्यसंघटक बाळू ढवळे, जिल्हा विध्यार्थी अध्यक्ष सनी मांगले, युवक क्षेत्र अध्यक्ष बंधू सुर्वे, युवक अध्यक्ष पंकज पुसाळकर, vj /nt सेल अध्यक्ष बाळा पंदेरे, मागसवर्गीय सेल अध्यक्ष प्रकाश जाधव, माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड, तालुका उपाध्यक्ष हुसेन बोबडे, माजी सरपंच मंगेश बांडागळे, नितीन भोसले, देवरुख युवक अध्यक्ष बंडू जाधव, उद्योजक राजन मोहिरे, सरपंच संतोष जाधव, उपसरपंच विनोद वाडकर, रामू पंदेरे, पिंका कांबळे, अंनत जाधव युवक शहर उपाध्यक्ष दिपक खेडेकर, राजू वनकुंद्रे, यशवंत गोपाळ, राजा भेर्ये, सुनील भेर्ये, दत्ताराम गोपाळ, रवींद्र लाड, वसंत तावडे, देवेंद्र पेंढारी, मनोहर करंबेळे,पदाधिकारी उपस्थित होते.