करणी सेनेचे नेते सुरजित सिंग राठोडला मुंबईत अटक, मॉडेलने केले गंभीर आरोप

Spread the love

करणी सेनेचे नेते सुरजित सिंग राठोड यांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. एका मॉडेलचा विनयभंग आणि छळ केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. मॉडेलने मुंबईतील बांगूर नगर पोलिस स्टेशनमध्ये सुरजित सिंग राठोड विरोधात गंभीर आरोप करत एफआयआर दाखल केला आहे.

आयपीसी कलम ३५४ (ए) (डी), ५००,५०९,५०१,६७ अन्वये सुरजीतविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. सुरजित सिंग राठोड हे चित्रपटसृष्टीशी संबंधित आहेत. सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही ते खूप चर्चेत होते.

सुरजीतने दावा केला होता की, १५ जून २०२० रोजी तो रिया चक्रवर्तीला कूपर हॉस्पिटलच्या शवागारात घेऊन गेला होता, जिथे पोस्टमॉर्टमनंतर सुशांतचा मृतदेह ठेवण्यात आला होता. १४ जून २०२० रोजी, सुशांत सिंग राजपूत त्याच्या खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. जेव्हा सुशांतचा मृत्यू आत्महत्या की हत्या अशी चर्चा सुरू होती, तेव्हा सुरजित सिंगने अनेक माध्यमांना दिलेल्या निवेदनात दावा केला की, रियाने हॉस्पिटलच्या शवागारात सुशांत सिंग राजपूतच्या छातीवर हात ठेवून सॉरी बाबू म्हटले आणि रडू लागली.

अखिल भारतीय राजपूत करणी सेनेचे सदस्य सुरजित सिंग राठोड यांनी सांगितले होते की, सुशांतचा चुलत भाऊ आणि आमदार नीरज सिंग बबलू त्यांच्या जवळचे आहेत. त्यांनी सुशांत सिंगचा मित्र आणि निर्माता संदीप सिंगवरही गंभीर आरोप केले होते.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page