
मुंबई- आज ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी खासदारकीच्या जागा वाटपाबाबत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. विनायक राऊत म्हणाले, ‘येणारी लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाटपावर अद्याप चर्चा झालेली नाही, मात्र आता पर्यंत शिवसेनेचे सर्वात जास्त खासदार निवडून आले आहेत. ते क्षेत्र तसेच ठेवायचे आणि उरलेल्या लोकसभा क्षेत्रातील जागांचे समान वाटप करायचे. असा कोणता फॉर्म्युला आला तर सहनभूतीपूर्वक विचार होऊ शकतो. कर्नाटकचा फॉर्म्युला महाराष्ट्रामध्ये लागू होणार नाही, इथे फक्त उध्दव ठाकरे यांचा फॅार्म्युला चालतो,असं मत व्यक्त केले.
याचसोबत फडणवीसांवर बोलताना, ‘देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाची चिंता करू नये. त्याच्या पक्षात एक ना धड बाराभर चिंध्या हे जे काही सुरू आहे, त्यांनी त्याचे पाहावे आणि शिंदे गटाला सोबत घेतल्याने भाजपला जी पनोती लागली आहे ते त्यांनी ती पाहावी,असं मत त्यांनी व्यक्त केली आहे.
नितेश राणे यांनी खासदार विनायक राऊतांवर केलेल्या वक्तव्याचा देखील विनायक राऊतांनी समाचार घेतला, ‘नितेश राणे म्हणजे आमच्यासाठी चिंपाट माणूस आहे.भाजपने त्यांना फक्त भुकण्यासाठी ठेवले आहे. भुकणारं कुत्रं कधी चावत नसतं,असं वक्तव्य यावेळी विनायक राऊत यांनी केलं.