पनवेल – कर्नाळा बँक संघर्ष समितीतर्फे कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणार्या ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार दि. 25 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 3 वाजता किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर कार्यक्रमास किरीट सोमय्या हे उपस्थित राहणार असून संघर्ष समितीने सदर कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे सदर पुस्तकातून कर्णाला बँक घोटाळ्यातील संघर्षाची गाथा मांडण्यात आली आहे. किरीट सोमय्या यांनी सदर विषयांमध्ये पाठपुरावा करून संघर्ष केला होता त्याला यश आले म्हणून सदरचे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देणारे गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके यांचे निधन …..
निधनानंतरही पंढरीशेठ फडके यांचा सोशल मीडियावर मोठा दबदबा …
वोल्वो मर्सिडीज गाडीवाला गाण्याने मोठी प्रसिद्धी…
पनवेल – महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देणारे गोल्डनमॅन,महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे मा.अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचे आज निधन झाले.निधनानंतरही पंढरीशेठ फडके यांचा सोशल मीडियावर मोठा दबदबा असलेला पहावयास मिळत आहे.वोल्वो मर्सिडीज गाडीवाला हे त्यांच्यावरील गाणे खूप फेमस झाले होते.
पनवेल तालुक्यातील विहीघरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.त्यांचे नाव घेतले की अंगावर किलोभर सोने, गाडीच्या टपावर बसून वरात आणि बादल बैलाची क्रेझ हे सगळं चित्र डोळ्यासमोर यायचं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेवर तसेच फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पनवेल तालुक्यातील विहिघर येथील पंढरीनाथ फडके संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीसाठी प्रसिद्ध होते.1996 पासून वडिलांमुळे पंढरीनाथ फडकेंना बैलगाडीचा नाद लागला.शर्यत जिंकल्यावर कोंबडा किंवा मेंढा मिळायचा तरीही शर्यत जिंकायची क्रेझ वेगळी होती. तिथपासून सुरू झालेली आवड फडकेंनी जपली होती.
आत्तापर्यंत 40 ते 50 शर्यतींची बैल त्यांनी राखून ठेवली होती. कोणत्याही शर्यतीमध्ये एक नंबरला असलेला बैल पळायला लागला की त्याच्यावर पंढरीशेठ यांची नजर असायची.त्यानंतर त्याची कितीही किंमत असली तरी ते विकत घ्यायचे.त्यांच्याकडे महाराष्ट्रातील टॉपचा समजला जाणारा बादल बैल याने तब्बल 11 लाख रुपयांची शर्यत जिंकली होती.आज 21 फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.पंढरीशेठ फडके हे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे तसेच सर्व राजकीय पक्षांशी त्यांचे जवळचे संबंध होते.अडल्या नडल्यांना मदत करणे ही त्यांची आवड होती.त्यामुळे अनेकांचा पोशिंदा गेल्याचे दुःख पनवेल तालुक्याला झाले आहे.