मंडणगड (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी उपप्रचार्य डॉ. वाल्मिक परहर, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विष्णू जायभाये, डॉ. राम देवरे, डॉ. ज्योती पेठकर, डॉ. महेश कुलकर्णी, डॉ. शैलेश भैसारे, प्रा. अशोक कंठाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांचे हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. विष्णू जायभाये यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
याप्रसंगी प्राचार्य डॉ.राहूल जाधव यांनी षिक्षण हेच कर्म अन् समाजसेवा धर्म मानणारे कर्मवीर, समाज सुधारक, शिक्षण प्रसारक आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, कमवा आणि शिका या संकल्पनेवर काम करत शिक्षणाची ज्ञानगंगा गरिबांच्या घरापर्यंत पोचवणारे कर्मवीर यांच्या जीवनकार्याची थोडक्यात माहिती सांगताना शिक्षणक्षेत्रातील विशिष्ट वर्गाची मक्तेदारी मोडीत काढून दुर्लक्षित व बहुजन समाजाला शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आयुष्यभर झपाटल्यासारखे काम केले. शिक्षणाशिवाय समाज जागृत होणार नाही हे ओळखून त्यांनी शिक्षणाचे कार्य हाती घेतले व तळागाळापर्यंत शिक्षणाचा प्रसार केला. म्हणून आजही त्यांचे कार्य प्रेरणादायी व उल्लेखनीय आहे.
सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विष्णू जायभाये यांनी तर आभार डॉ. शैलेश भैसारे यांनी मानले.
मंडणगड प्रतिनिधी