
कर्जत- 1 मे दिनाचा अवचित साधून कबड्डी खेळाडूना प्रोत्साहन देण्यासाठी मनसे कर्जत तालुका याच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन श्री सचिन गायकर नेरळ शहर उपाध्यक्ष व कु करण खडे मनविसे अध्यक्ष नेरळ शहर यांच्या वतीने करण्यात आला . या तसेच स्पर्धेचे प्रमुख आकर्षण सर्वांचे लाडके मा.श्री जितेंद्र भाई पाटील रायगड जिल्हा अध्यक्ष मनसे व सर्वांचे लाडके आमदार मा श्री राजू दादा पाटील यांनी उपस्थति मानाची ठरली .
स्पर्धेचे उघाटन तालुका अध्यक्ष महेंद्र दादा निगुडकर तालुका अध्यक्ष मनसे ,श्री प्रसन्न बनसोडे रायगड मनविसे अध्यक्ष , श्री हेमंत दादा चव्हाण नेरळ अध्यक्ष. व नेरळ गावचे उपसरपंच मा .श्री मंगेश दादा म्हसकर याच्या हस्ते झाला .
तसेच श्री .सुरेश दादा टोकरे व सौ माधवी ताई जोशी याची उपस्थित लाभली .
सदर स्पर्धेत भैरवनाथ हालिवली या संघाने प्रथम क्रमांक, जाणता राजा स्पोर्टस नेरळ या संघाने द्रुतीय क्रमांक , जय हनुमान संघ पोशीर तृतीय आणि जय मल्हर अवसरे मनिवळी चतुर्थ क्रमांक सदर स्पर्धेमध्ये मिळवले आहेत. सदर संघांचे मान्यवरांनी आभार मानले आहेत.
तसेच वयक्तीक बक्षीस म्हून उत्कृष्ट खेळाडू कु प्रशांत चव्हाण हालिवली,
उत्कर्ष रेडर विकी पवार नेरळ आणि उत्कृष्ट पक्कड हेमंत चव्हाण अवसरे मानिवळी आणि पब्लिक हिरो श्री केतन कडू याना देण्यात आला.
या आयोजन केल्या बदल जितेंद्र भाई पाटील यांनी दोनी आयोजकांचे केले विशेष कौतुक व आभार मानले.